• Sat. Sep 21st, 2024

Pune News: बेसावध प्रवाशांना गाठताहेत चोरटे; स्वारगेट बस स्थानक परिसरात चोरीच्या घटना समोर

Pune News: बेसावध प्रवाशांना गाठताहेत चोरटे; स्वारगेट बस स्थानक परिसरात चोरीच्या घटना समोर

म. टा. प्रतिनिधी, पुणे : स्वारगेट पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एसटी स्थानक आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस थांब्यावर प्रवाशांच्या, विशेषत: महिला प्रवाशांकडील ऐवजावर चोरांची नजर असल्याचे दिसून येते. नवीन वर्षात आतापर्यंत स्वारगेट एसटी स्थानक आणि पीएमपीत सोन्याचे दागिने चोरीच्या सात घटना घडल्या असून, चोरांना अटकाव करण्यात स्वारगेट पोलिसांना अपयश आले आहे.

स्वारगेट चौकापासून ५० मीटर अंतरावर पोलिस ठाणे आहे. पोलिस ठाण्याच्या अगदी समोरील बाजूस एसटीचे स्थानक आहे, तर शंभर मीटर अंतरावर पीएमपीचा मुख्य बसथांबा आहे. त्यामुळे या परिसरात कायमच प्रवाशांची मोठी वर्दळ असते. बस आणि ‘एसटी’साठी प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन चोरटे प्रवाशांच्या किमती ऐवजावर नजर ठेवून असतात. बसमध्ये चढताना प्रवासी बेसावध असतात, त्या वेळी चोरटे डाव साधतात. एसटी स्थानक परिसरात चार आणि पीएमपीत चोरीच्या तीन घटना घडल्या आहेत.

पोलिसांची गस्त होते?

काही वर्षांपूर्वी एसटी स्थानकातील चोरीच्या घटना लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्वारगेट, शिवाजीनगर एसटी स्थानकात पोलिसांचा ‘हेल्प डेस्क’ सुरू केला होता. त्या ठिकाणी दोन पोलिस कर्मचारी नेमले होते. प्रवाशांना मदत, स्थानकात गस्त घालणे आणि संशयितांना अटकाव करणे, याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. मात्र, आता ही योजना बंद झाली आहे. हाकेच्या अंतरावर असूनही स्वारगेट पोलिस एसटी स्थानकात गस्त घालतात की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चालू बसमध्ये असं काय घडलं की थेट पोहोचली पोलीस ठाण्यात; नागपुरात ५ महिलांना अटक
स्वारगेट परिसरातील चोरीच्या घटना

– स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवाशाच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी चोरून नेली. तरुण बसमध्ये चढत असताना घडला प्रकार.
– कात्रज ते स्वारगेट मार्गावरील बसने प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधील सात लाख रुपयांचे दागिने चोरले.
– स्वारगेट येथील एसटी कॉलनीत ज्येष्ठ नागरिक महिलेकडील रोख रक्कम व सोन्याचे दागिने हातचलाखीने चोरले.
– स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्वारगेट एसटी स्थानक येथे स्वारगेट-पंढरपूर ‘एसटी’बसमध्ये चढणाऱ्या महिलेची एक लाख ८० हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरून नेण्यात आली.
– स्वारगेट स्थानकात ‘एसटी’मध्ये चढताना गर्दीचा गैरफायदा घेऊन प्रवासी तरुणाला धक्काबुक्की करून त्याची सोनसाखळी हिसकावली.
– स्वारगेट पीएमपी थांब्यावर बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाच्या खिशातील ५५ हजार रुपयांचा मोबाइल चोरून नेला.
– एसटी बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून नेली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed