• Sat. Sep 21st, 2024
२२ जानेवारीला मर्यादा पुरुषोत्तम दिन म्हणून घोषित करा, हिंदू महासभेची मागणी

मुंबई: अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी या दिवशी होत असून तो दिवस मर्यादा पुरुषोत्तम दिन म्हणून घोषित करण्यात यावा, अशी मागणी हिंदुमहासभेच्या वतीने राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु आणि केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. याबाबत हिंदु महासभेचे राष्ट्रीय नेते दिनेश भोगले यांनी सांगितले की, हिंदू महासभेच्या वतीने, तत्कालीन फैजाबाद जिल्हाध्यक्ष स्वर्गीय ठाकुर गोपालसिंह विशारद यांनी रामलल्लाच्या दर्शन, पूजेचा अधिकार मिळण्यासाठी दिवाणी न्यायालयात (३/१९५०) वादपत्र प्रस्तुत करुन न्यायालयीन लढा सुरु केला होता.
बळे आगळा राम कोदंडधारी! अयोध्येच्या मंदिरातील रामलल्लाचं मोहक रुप पाहिलंत का?
रामजन्मभूमीची विवादीत २.७७ एकर जमीन हिंदू महासभा, निर्मोही आखाडा आणि वक्फ बोर्डला समान विभागून देण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या दिनांक ३० सप्टेबर २०१० च्या निर्णयाविरोधात हिंदू महासभेने न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या रामलल्ला विराजमानच्या बाजूने दिलेल्या निर्णयामुळे हिंदू महासभेने लढलेल्या प्रदीर्घ लढ्याची इतिश्री झाली आहे. या निर्णयामुळे विवादीत रामजन्मभूमी अखंड हिंदूकडे आली आहे. श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेक्षणी शतकांपासूनचा संघर्ष समाप्त होऊन समस्त हिंदूना रामलल्लाच्या दर्शनाचा, पुजेचा मुक्त अधिकार प्राप्त होणार आहे, असं ते म्हणाले.

प्रणिती शिंदेंच्या प्रचाराने अडचणी वाढल्या तरी आडम मास्तरांनी रे नगर गृहप्रकल्प साकारलाच

त्यामुळेच हिंदू महासभेची धारणा आहे की, हा दिवस राष्ट्रीय दृष्टीने खुप महत्वाचा आणि विलक्षण आहे. रामलल्ला हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतिक आहेत. श्रीराम हिंदूचे उच्च श्रद्धेयस्थान आहेय समस्त हिंदू त्यांना मर्यादा पुरुषोत्तम मानतात. समस्त हिंदूच्या या धारणेस अनुसरुन, हिंदू जनभावनांचा आदर राखण्यासाठी आणि २२ जानेवारीचा राममंदिराच्या गर्भगृहातील, विलक्षण, अद्भुत, आनंदमयी, मंगलमय रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा निरंतर अविस्मरणीय रहावा, यासाठी हा दिवस “मर्यादा पुरुषोत्तम दिन” केंद्र शासनाने घोषित करावा, अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेच्यावतीने निवेदनात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed