• Mon. Nov 25th, 2024
    अनेक रामायणांमध्ये राम वेगवेगळा, वाल्मिकी यांचा राम कशामुळे खरा मानायचा? : भालचंद्र नेमाडे

    जळगाव : लेखकांनी सत्य कशा पद्धतीने मांडले पाहिजे हे सांगताना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी प्रभू श्री रामचंद्र आणि रामायणावर भाष्य केलं. राम शाकाहारी होता की मांसाहारी होता, हे वाचूनच लक्षात येतं. त्यामुळे टीव्ही, भाषण या माध्यमातून सत्य कळणार नाही किंवा त्यावर कशासाठी चर्चा करायची? बरं एकच रामायण आहे का? वेगवेगळ्या लिखित रामायणामध्ये राम सुद्धा वेगवेगळा आहे. कंबोडियातला राम वेगळा आहे, जैन रामायणातला राम वेगळा आहे, काही ठिकाणी सीता ही रामाची बहीण आहे. काही ठिकाणी सीता ही रावणाची मुलगी आहे, अशा पद्धतीने अनेक युगांमधून बदलून वाल्मिकीच्या काळातलं रामायण आपण वाचतो. केवळ वाल्मिकींचा राम खरा कसा मानायचा? असा प्रश्न ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केला आहे.

    जळगाव शहरातील जैन हिल्स परिसरातील गांधीतीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या साहित्य पुरस्कारांचे वितरण सोहळा पार पडला. पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून डॉ. भालचंद्र नेमाडे उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. साहित्यिकांनी नुसतेच लेखक म्हणून नव्हे तर त्यांनी नाविन्य शोधून समाजात ‘टुल किट’ सारखे काम करावे. मी जसा आहे तसंच व्यक्त व्हावे. अनन्यसाधारण, युनिकपणा लेखकात असावा अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केली.

    ‘तेव्हा’ मी अयोध्येला जाईन, प्रभूरामांचं दर्शन घेईन; पवारांनी पत्र लिहून ‘टायमिंग’ कळवलं
    साहित्यिकाने खोलात जाऊन सत्य शोधले पाहिजे

    साहित्यिकाने सत्य कसे शोधले पाहिजे हे सांगत असताना भालचंद्र नेमाडे यांनी प्रभू राम आणि रामायणाचं उदाहरणं दिलं. राम हा शाकाहारी होता का मांसाहारी होता यावर चर्चा कशाला हवी? साहित्यिकाने खोलात जाऊन ते शोधलं पाहिजे. त्याच पद्धतीने एकच रामायण नाही, वेगवेगळ्या लिखित रामायणमध्ये सुद्धा राम हा वेगळा होता. ‘थ्री हंड्रेड’ रामायण नावाचे पुस्तक रामार्जून यांनी लिहिलं त्यात राम हा वेगळा होता. ते पुस्तक बंद पाडलं. कंबोडियातला राम हा वेगळा होता. जैन रामायणामधला राम हा वेगळा आहे, काही ठिकाणी सीता ही रामाची बहीण आहे. अशा पद्धतीने अनेक युगांमधून बदलत बदलत वाल्मिकीचं रामायण आपण वाचायला लागलो, असं नेमाडे म्हणाले.

    एकच रामायण नाही, साहित्यिकांना सर्वच रामायण माहित पाहिजे

    वाल्मिकी हा श्रृंग घराण्याचा दरबारी कवी होता. शृंगांना जस आवडलं तसं रामायण वाल्मिकी यांनी लिहिलं. त्यामुळे खरे कोणते राम? वाल्मिकीचा राम कशामुळे खरा म्हणायचा. त्याआधी मी आसाममध्ये एक कर्वे लोकांचे एक रामायण केलं, त्यांच्या रामायणात सीता मुख्य आहे. ती रामाला आज्ञा करत असते. अक्कल नाही असं म्हणत रामाला शिव्या देत असते, असं आहे… त्यामुळे करबी लोकांचे रामायण खरं की जैन, कंबोडियन लोकांचं रामायण खरं? असे प्रश्न नेमाडे यांनी विचारलं.

    हिमालय हलवण्याची ताकद आमच्या सारख्या रामसेवकात, राजकीय हिंदुंनी आम्हाला हिंदुत्व सांगू नये – देवेंद्र फडणवीस
    थ्री हंड्रेड रामायण का वाचू देत नाही लोकांना…?

    थ्री हंड्रेड रामायण का वाचू देत नाही लोकांना… ते पुस्तक का नाही मिळत? असाही सवाल यावेळी भालचंद्र नेमाडे यांनी उपस्थित करत मला खूप काही सांगायचं होतं, पोलिसांचं प्रोटेक्शन असल्यामुळे मी जास्त बोलत नाही, असंही जाताजाता भालचंद्र नेमाडे म्हणाले.

    ठाकरेंच्या प्लानवर मोदींनी फिरवला ‘झाडू’?; नाशिक दौऱ्यात अनेक निशाणे, मंदिर भेटीने काय साधले?
    भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन तर्फे तिसरा द्विवार्षिक ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ नाटककार पद्मश्री सतीश आळेकर यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप दोन लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ आणि ग्रंथसंपदा असे आहे. श्रेष्ठ लेखिका म्हणून बहिणाई पुरस्कारासाठी श्रीमती सुमती लांडे, (श्रीरामपूर), श्रेष्ठ कवी म्हणून बालकवी ठोमरे पुरस्कारासाठी अशोक कोतवाल (जळगाव) तर श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ना. धों. महानोर पुरस्कारासाठी सीताराम सावंत यांना (इटकी, जि. सातारा) यांना समारंभ पूर्वक वितरण करण्यात आला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed