• Mon. Nov 25th, 2024

    पैसे दे नाहीतर सहकारी महिलेसोबतचे सेल्फी पत्नीला पाठवू, डॉक्टरला धमकी, २० लाख उकळले अन्…

    पैसे दे नाहीतर सहकारी महिलेसोबतचे सेल्फी पत्नीला पाठवू, डॉक्टरला धमकी, २० लाख उकळले अन्…

    परभणी: सहकारी महिला डॉक्टरसोबत वाढदिवस साजरा करताना काढलेली सेल्फी परभणीतील एका डॉक्टरला फार महागात पडली आहे. त्या सेल्फीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू आणि तुमच्या पत्नीला व्हाट्सअप वर पाठवू, अशी धमकी देत डॉक्टरकडून तब्बल वीस लाख रुपयांची खंडणी वसूल केल्याची घटना परभणी शहरात घडली आहे. याप्रकरणी डॉक्टरने नवा मोंढा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून १७ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार डॉक्टरचे नाव मोहम्मद जाहिद अली खान असे आहे. परभणी शहरातील एकबाल नगर परिसरात मासूम हॉस्पिटल आहे. हे हॉस्पिटल डॉक्टर मोहम्मद जाहीर आली आणि त्यांची डॉक्टर पत्नी हे दोघे मिळून चालवतात. २०१५ पासून डॉक्टरकी पेशा करत असलेल्या मोहम्मद खान यांच्या हॉस्पिटलमध्ये २०१८ साली डॉक्टर नवनीत या प्रॅक्टिस करण्यासाठी आल्या होत्या. चार महिने डॉक्टर नवनीत यांनी मासूम हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस केली. यादरम्यान डॉक्टर नवनीत यांच्या वाढदिवसानिमित्त दवाखान्यामध्ये केकही कापण्यात आला.
    तरुणी झोपेत असताना घरात शिरला; चाकूने वार, नंतर स्वत:चं जीवन संपवण्याचा प्रयत्न, तरुणाच्या कृत्यानं गावात खळबळकेक कापताना आणि वाढदिवस साजरा करताना डॉक्टर मोहम्मद जाहीर अली यांनी डॉक्टर नवनीत यांच्यासोबत सेल्फी फोटो काढले होते. चार महिन्यानंतर डॉक्टर नवनीत या आपली प्रॅक्टिस पूर्ण करून दवाखाना सोडून गेल्या. डॉक्टर मोहम्मद आणि डॉक्टर नवनीत यांचे सेल्फी काढलेले फोटो डॉक्टरांनी आपल्याच हॉस्पिटलमध्ये मेडिकल चालवत असलेल्या सय्यद हुसेन यांच्या मोबाईलमध्ये ठेवले होते. १५ नोव्हेंबर २०२३ रोजी डॉक्टर मोहम्मद यांना अनोळखी मोबाईलवरून फोन आला. डॉक्टर नवनीत यांच्यासोबत सेल्फी काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू आणि तुमच्या पत्नीला पाठवू, अशी धमकी देण्यात आली. तसेच प्रत्यक्ष भेटा असेही धमकी देणाऱ्यांनी सांगितले.

    त्यानंतर यांनी वेळोवेळी फोन करून कधी दोन लाख रुपये तर कधी तीन लाख रुपये तर कधी दहा लाख रुपये असे एकूण २० लाख रुपयांची खंडणी डॉक्टरकडून वसूल केली. डॉक्टर मोहम्मद यांनी वेळोवेळी त्या खंडणीखोरास पैसे दिले. डॉक्टरने प्रतिष्ठेला घाबरुन जवळपास २० लाख रुपये दिले. नोव्हेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत खंडणीचा प्रकार घडला. पण खंडणीखोरांची मागणी काही थांबत नव्हती. त्यामुळे शेवट डॉक्टर मोहम्मद यांनी कंटाळून नवा मोंढा पोलीस ठाणे गाठले. याबाबत डॉक्टरने नवा मोंढा पोलीसात तक्रार दिली.

    जरांगेंचं आंदोलन ही आग, त्यात हात घालाल तर भाजल्याशिवाय राहणार नाही, राजू शेट्टींचं सरकारला आवाहन

    पोलिसांनी संबधित मोबाईल धारकाला बोलावून त्याची चौकशी केली. त्याने इतर मित्रांसोबत मिळून डॉक्टरचे सेल्फी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन २० लाख रुपयांची खंडणी घेतल्याचे कबूल केले. याप्रकरणी मोहम्मद जाहेद अली खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेख रहिम शेख कलीम, सुफीयान खान अकबर खान, मोहम्मद इतर खुहुस सैफुल्ला बरेख बरेखानी, वा अनोळखी साथीदारांवर नवा मोंढा पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed