• Mon. Nov 25th, 2024
    शिंदेंच्या बंडाचा पहिला दिवस ते नार्वेकरांनी दिलेला निकाल, असीम सरोदेंनी नवी गोष्ट मांडली

    मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर बाजू स्पष्ट करण्यासाठी जनता न्यायालय आयोजित केलं होतं. जनता न्यायालयाला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत यांच्यासह प्रमुख शिवसेना नेते उपस्थित होते. यावेळी कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे आणि अ‍ॅड. रोहित शर्मा उपस्थित होते. अ‍ॅड.असीम सरोदे यांनी यावेळी राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर आक्षेप घेतले. सरोदे यांनी सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर दिलेल्या निकालपत्रातील दाखले यावेळी दिले.

    अ‍ॅड. असीम सरोदे काय म्हणाले?

    कायदा जर लोकांसाठी असेल तर लोकांमध्ये बोलला गेला पाहिजे, असं अ‍ॅड. असीम सरोदे म्हणाले. जनता न्यायालयात केवळ सत्याची बाजू मांडली जाईल. शिवसेनेनी हा कार्यक्रम आयोजित केला याबाबत त्यांचे आभार मानतो, असं सरोदे म्हणाले. राहुल नार्वेकर यांच्याबद्दल व्यक्ती म्हणून काही बोलायचं नाही पण कायदेविरोधी प्रवृत्ती तयार होत आहे त्याबद्दल बोलायला हवं. १० जानेवारी २०२४ चा निकाल समजून घेणं, त्याचं विश्लेषण करणं हे समजून घेणं आवश्यक आहे, असं सरोदे म्हणाले.

    उद्धव ठाकरे हे संविधानाच्या बाजूनं आहेत, असं सरोदे यांनी म्हटलं. पक्षांतर बंदी कायदा हे १० व्या परिशिष्ठाचं नाव आहे. १० व्या परिशिष्ठाचं नाव पक्षांतर सोप्या पद्धतीनं करणं असं त्याचं नाव नाही, असं असीम सरोदे म्हणाले. राजकीय अस्थैर्य निर्माण होऊ नये यासाठी राजीव गांधी यांनी हा कायदा आणला, असं सरोदे यांनी म्हटलं.
    भरपूर पाऊस, जगात शांतता, महागाईचं काय? सिद्धरामेश्वर महाराजांच्या महायात्रेत वासराची भाकणूक
    असीम सरोदे यांनी यापुढे बोलताना पक्षांतर बंदी कायद्याविषयी माहिती दिली. विधिमंडळ पक्षाचं आयुष्य हे पाच वर्षांचं असतं. विधिमंडळ पक्ष ही अस्थायी स्वरुपाची व्यवस्था आहे. मूळ राजकीय पक्षाला महत्त्व आहे. एकनाथ शिंदे आणि पळून गेलेले सदस्य हे पाच वर्षांच्या अस्थायी पक्षाचे सदस्य आहेत, असं सरोदेंनी म्हटलं.
    विनोद तावडेंनी गेल्यावेळी चंदीगढमध्ये महापौर निवडून आणला, यंदा इंडिया आघाडी गेम फिरवणार, भाजपला पहिला धक्का?
    पक्षांतरबंदी कायद्यानुसार राजकीय पक्ष स्वत:हून सोडायचं असेल तर ते पक्ष सोडू शकतात, मात्र ते आमदार म्हणून कार्यरत राहू शकत नाहीत. व्हीपचं पालन न केल्यास त्यांची अपात्रता होऊ शकते. पक्षात फूट झाली असेल तर पूर्वी संरक्षण असायचं. मात्र, आता फूट पडलीय, जास्त संख्येने आहोत असं म्हणण्याचा अधिकार कुणाला राहिलेला नाही. पक्ष सोडणाऱ्यांना राजकीय पक्षात विलीन होऊ शकतात, राजकीय गट निर्माण करु शकतात. शिंदे गटाचे लोक कोणत्याही पक्षात विलीन झालेले नाहीत. त्यामुळं ते अपात्र ठरतात. दोन तृतियांश लोकं बाहेर गेले तर त्यांना वेगळा राजकीय गट स्थापन करता येतो. मात्र, एकनाथ शिंदे हे दोन तृतियांश संख्येने बाहेर गेले नाहीत. ते पहिल्यांदा १६ जण गेले होते. नंतर काही जण सूरत, गुवाहाटी, गोवा आणि मुंबईत जाऊन मिळाले. मात्र, हे दोन तृतियांश बहुमतानं बाहेर पडले नाहीत त्यामुळं ते अपात्र होऊ शकतात, असं असीम सरोदे म्हणाले.
    महाविकास आघाडीचं जागावाटपाचं सूत्र ठरण्याआधीच काँग्रेसचा डाव, मित्रपक्षांवर कुरघोडी करण्याचं पहिलं पाऊल

    आमदार अपात्रतेच्या निकालापूर्वी १० व्या परिशिष्टाच्या वापराबाबत राहुल नार्वेकरांचं सूचक वक्तव्य

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *