• Sat. Sep 21st, 2024

राम मंदिरासाठीच्या कारसेवेवेळी तिघे भाऊ तुरुंगात गेलेलो, श्रीराम सर्वांचेच : गुलाबराव पाटील

राम मंदिरासाठीच्या कारसेवेवेळी तिघे भाऊ तुरुंगात गेलेलो, श्रीराम सर्वांचेच : गुलाबराव पाटील

जळगाव: मध्ये झालेल्या महायुतीच्या बैठकीत पाचोर्‍याचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी भाजपच्या जिल्हाप्रमुखांसह आमदार आणि खासदारांवर मंत्री गिरीश महाजन यांच्या समोर तीव्र नाराजी व्यक्त केली. पाचोरा मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून महायुतीचे उल्लंघन केले जात असून त्याच भाजपचे जिल्हाप्रमुखआणि आमदार खासदारही पाठिंबा देत असल्याची खंत आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केली. किशोर पाटील यांच्या नाराजी वरून मंत्री गुलाबराव पाटलांनी गिरीश महाजनांसमोर खडे बोल सुनावले.

आम्ही ४० जणांनी आयुष्याचं करिअर डावावर लावून सट्टा खेळला आहे. आमचा जर निकाल चुकीचा लागला असता तर आमचं काय झालं असतं याचा विचार भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. त्यामुळे अशा परिस्थितीत कोणी आगाऊपणा करत असेल आणि गद्दारी करत असेल तर, अशा कार्यकर्त्यांना भाजपने लाथाळलं पाहिजे, अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी गिरीश महाजनांसमोर भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.

अयोध्या मंदिराचा प्रभू श्री रामचंद्र यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा भाजपकडून इव्हेंट केला जात असल्याचे ठिकाण राज्यभरातील विरोधकांकडून केली जात असतानाच मंत्री गुलाबराव पाटील यांनी आश्चर्यकारक वक्तव्य केलं आहे. रामाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आम्हाला करायचं नाही. राम हा सर्वांचा आहे. अयोध्या येथे राम मंदिर व्हावे यासाठी आम्हीसुद्धा तिघे भाऊ जेलमध्ये गेलो होतो. त्यामुळे प्रभू श्री रामचंद्र हे सर्वांचेच आहेत, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता भाजपच्या मंत्री तसेच पदाधिकाऱ्यांसमोरच भाजपला चिमटा काढला आहे..
भाजपसाठी कदाचित मणिपूर भारताचा भाग नसेल, राहुल गांधींचा हल्लाबोल, भारत जोडो न्याय यात्रेचा शुभारंभ
जळगावचे आमदार सुरेश भोळे यांना उद्देशून मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की आम्ही सुद्धा घरोघरी झेंडे वाटत आहोत तिळगुळ वाटत आहोत. राम मंदिरासाठी जेव्हा कारसेवा झाली त्यावेळेस आम्ही सुद्धा तिघे भाऊ जेलमध्ये गेलो होतो, अशी आठवण सुद्धा यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले..
एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून नरेंद्र मोदींचे हात बळकट करायचेत, मिलिंद देवरांचं वक्तव्य, शिवसेनेत दाखल
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून विकासाचा रथ सुसाट वेगात आहे. हा रथ असाच सुसाट धावावा यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी एक दिलाने काम करा असे मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
अहमदनगरमध्ये महायुतीत चाललंय काय? मेळाव्यास अजितदादांच्या तीन आमदारांची दांडी, विखेंचं समन्वयकांकडे बोटRead Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed