• Mon. Nov 25th, 2024
    एकला चलो रे म्हणा… निवडणुकीत युती नको, स्वबळावर लढुया, मनसे कार्यकर्त्यांची राज ठाकरेंना गळ

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : कालपर्यंत एकमेकांवर चिखल फेकणारे आज मांडीला मांडी लावून बसलेले राजकारणात दिसतात. सर्वच राजकीय पक्षांची विश्वासार्हता राहिली नाही. त्यावेळी मतदार आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे मोठ्या विश्वासाने पाहतात. त्यामुळे आगामी निवडणुकीत पक्षाने कोणत्याही अन्य पक्षाशी युती न करता स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी मागणी करीत ‘एकला चलो रे…’ म्हटले पाहिजे, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांनी पुण्यात मांडली. यावर पक्षप्रमुख राज ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

    ‘जाती धर्माच्या नावाने एकमेकांमध्ये भांडणं लावली जातात. राजकारणाचा चिखल झाला आहे. कोण कोणत्या पक्षात आहे, हे सांगता येत नाही. मनसेचा पदाधिकारी होण्याअगोदर तो कार्यकर्ता असतो. त्याच्याकडे पद नसले तरी तो काम करतच असतो. तळागळातील सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मनसे सदैव तत्वर असल्याने पक्ष वाढत आहे,’ अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

    महाविकास आघाडी सोडली, पण दापोलीत ठाकरेंसोबत अजितदादा गटाची सत्ता कायम, कार्यकर्ते संभ्रमात

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हाध्यक्ष यांचा मेळावा शनिवारी गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी राज्यातील विविध सरपंचासह सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

    ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची भेट, उदय सामंत म्हणतात, विकासासाठी आम्ही एकत्र…
    ‘पक्ष म्हणून नागरिकांना सामोरे जाताना सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. पराभवाचे धक्के सहन करावे लागले. परंतु, खचून न जाता प्रयत्न करीत राहिल्याने आज यश मिळाले,’ असे काही ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी यावेळी सांगितले. ग्रामीण भागात मनसेचे काम करताना शाखा उघडताना काय काय अडचणी आल्या त्यावर काय उपाय केले, याची माहिती यावेळी उपस्थित सरपंचांनी दिली. ‘हिंमत केली त्याची किंमत होते ‘, हे आपल्याला आजपर्यंतच्या यशावरून दिसते, असेही मत यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

    मोदींच्या खांद्यावरुन शाल घसरली, शिंदेंनी अलगद सावरली, पंतप्रधानांची प्रतिक्रिया लाखमोलाची, पाहा व्हिडिओ
    पक्षाच्या नेत्यांनी केवळ शहरी भागात पक्षविस्तारासाठी लक्ष केंद्रीत करू नये. तर ग्रामीण भागातही लक्ष द्यावे. यामुळे तळागळातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येतो, याकडे काही सरपंचांनी आपल्या मनोगतात लक्ष वेधले. ‘शहरी भागातील राजकारण वेगळे असते. तर ग्रामीण भागात काम करताना अनेक आव्हाने येतात. त्यासाठी नेत्यांनी शहर किंवा ग्रामीण असा भेदभाव न करता पक्ष वाढीसाठी काय काम करता येईल यासाठी प्रोत्साहन द्यावे,’ अशी मागणी करण्यात आली.

    राज ठाकरेंनी शालेय जीवनात पाहिलेल्या भ्रष्टाचारी ग्रामपंचायतीचं नाव सांगताच सभागृहात हशा

    Read Latest Maharashtra Updates And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *