• Sat. Sep 21st, 2024
मनपाची १४० कोटी रुपयांची जागा हडपली; दहा जणांवर गुन्हे दाखल, वाचा नेमकं प्रकरण…

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या मालकीची जागा आपल्या मालकीची असल्याचे भासवून त्याची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मनपाच्या तक्रारीच्या आधारावर वाठोडा पोलिसांनी १० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या जागेची किंमत १४० कोटी रुपयांच्या घरात असल्याचे कळते.
दिघा गाव रेल्वे स्थानकावरून पहिली ट्रेन ठाण्याकडे रवाना; मात्र श्रेयवादावरुन भाजप आणि ठाकरे गटात जुंपली
मिळालेल्या माहितीनुसार, नत्थू जागो गिरीपुंजे, (रा. तरोडी खुर्द, ता. कामठी जि. नागपूर) धनराज जागो गिरीपुंजे, श्रीमती सजाबाई जागो गिरीपुंजे, मनोहर जागो गिरीपुंजे, श्रीमती लक्ष्मीबाई फत्तु गिरीपुंजे, प्रभाकर फत्तु गिरीपुंजे, श्रीमती अनिता अशोक कापसे, वनिता फत्तु गिरीपुंजे, सविता फत्तु गिरीपुंजे आणि स्नेहल डेव्हलपर्स ॲण्ड बिलडर्सचे मालक विलास तुकारामजी सातपुते, (रा. गोपालनगर) असी आरोपींची नावे आहेत.

मनपाच्या तक्रारीनुसार, वाठोडा पोलीस ठाणे हद्दीतील मौजा- तरोडी (खुर्द) येथे खसरा क्र. ५५ (जुना क्र. २/१, ५/१, ६/४ व ४) आराजी – ११.०७८ ही जमीन नागपूर महानगरपालिकेच्या ताब्यात व वहिवाटीत आहे. तरीसुद्धा आरोपींनी ही जमीन आपली असल्याचे दाखवून या जमिनीचे प्लॉट पडून त्यांची अवैद्यरीत्या विक्री केली, अशी तक्रार मनपा स्थावर विभागाचे कार्यकारी अभियंता पंकज पराशर यांनी केली आहे. त्यानुसार वाठोडा पोलिसांनी या दहाही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या जमिनीचे मूळ मालक जागो केशव तेली यांनी ३१ मार्च १९६२ला या जागेचा ताबा नागपूर सुधार प्रन्यासला दिला.

बारामतीत १६० विद्यार्थ्यांना दाखवला ‘सत्यशोधक’ चित्रपट, शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी प्रतिक्रिया!

पुढे १९६९मध्ये ही जागा नागपूर महानगरपालिकेला हस्तांतरीत झाली. त्यानंतर २०१६ मध्ये ‘साई’च्या प्रकल्पाकरिता जागा देतांना ७/१२ तपासण्यात आला. यावेळी या ७/१२ वर आरोपींची नावे नोंदविण्याचे समोर आले. या प्रकरणाची चौकशी केली असताना आरोपींनी ही जागा हडपल्याचे समोर आले. अखेर मनपाच्या तक्रारीच्या आधारावर या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेत. त्यांचे नाव नोंदवल्याचे दिसून आले. त्यानंतर मनपातर्फे गैरअर्जदार विरुद्ध नंदनवन पोलीस ठाणे येथे याबाबतची तक्रार देण्यात आली. तसेच मनपाद्वारे दुरूस्ती करून ७/१२ वर फेरफार क्र. ६३१ दि. १४/०९/२०१७ अन्वये मनपाचे नाव नोंदविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed