• Mon. Nov 25th, 2024

    मुंबईची जीवनवाहिनी ४०० किमीपार, बेलापूर-सीवूड-उरण मार्गाचे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

    मुंबईची जीवनवाहिनी ४०० किमीपार, बेलापूर-सीवूड-उरण मार्गाचे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: देशाच्या आर्थिक राजधानीतील जलद सार्वजनिक वाहतूकसेवा म्हणजे मुंबई लोकल. या मुंबई उपनगरीय रेल्वेचा चौथा मार्ग असलेल्या बेलापूर-सीवूड-उरण (बीएसयू) लोकलला आज, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ही लोकल प्रवासासाठी खुली झाल्यावर मुंबई लोकलची कक्षा ४०० किमीपार रुंदावणार आहे. फेब्रुवारी २०२२मध्ये पंतप्रधानांनी मुंबई लोकलच्या विस्ताराचा मानस व्यक्त केला होता. उरण लोकलच्या उद्घाटनानंतर या महाविस्ताराची वचनपूर्ती होत आहे.

    मध्य रेल्वे मुख्य मार्ग, हार्बर-ट्रान्सहार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील लोकलसेवा यांची लांबी एकूण ३९५ किमी आहे. बेलापूर-सीवूड दारावे-उरण रेल्वे प्रकल्पाचा दुसरा टप्पा म्हणजे उरण लोकल सुरू झाल्यानंतर १४६ स्थानकांसह लोकलचा आवाका ४०९ किमीपर्यंत वाढणार आहे.

    बेलापूर-खारकोपरदरम्यान सध्या रोज ४० फेऱ्या धावत आहेत. उरण लोकल सुरू झाल्यानंतर उरणपर्यंत फेऱ्यांचा विस्तार करण्यात येणार आहे. प्रवासी प्रतिसादानंतर वाढीव फेऱ्यांबाबत विचार करण्यात येईल, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. बेलापूर-उरण रेल्वे मार्गावरील खारकोपरपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन तत्कालीन रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडले होते.

    देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी पूल, ‘अटल सेतू’चे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

    ‘दिघा गाव’वर शिक्कामोर्तब

    ट्रान्सहार्बरवरील ठाणे ते एरोलीदरम्यान दिघा गावातील रेल्वे स्थानकाला ‘दिघा गाव’ असे नाव देण्यावर रेल्वे मंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. या स्थानकाच्या नावावरून वाद सुरू होता. मात्र रेल्वे मंडळाच्या निर्णयानंतर त्याला पूर्णविराम मिळाला आहे. या स्थानकासाठी ९० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.


    १७६ किमी रूळ वाढणार

    मुंबई शहरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) ३ आणि ३अ मध्ये १७६ किमीच्या रेल्वे मार्गिका उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. नवीन पनवेल-कर्जत लोकल मार्गिका (२८ किमी), विरार-डहाणू रोड चौपदरीकरण (६४ किमी), बोरिवलीपर्यंत हार्बर (७ किमी) यांचा समावेश आहे. कल्याण-आसनगाव (३२ किमी), कल्याण-बदलापूर (१५ किमी) आणि बोरिवली-विरार (२६ किमी) दरम्यान मार्ग विस्ताराचे काम सुरू आहे. महामुंबईतील वाढीव रेल्वे रुळांसाठी सन २०२६ अखेर १३ हजार ११५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

    औषध विक्रीच्या दुकान मालकांची कोर्टात धाव; मंत्र्यांकडून सुनावणी होत नसल्याने न्यायालयाची नाराजी

    असा आहे मार्ग

    बेलापूर-सीवूड (पहिला टप्पा) : १२.४

    खारकोपर-उरण (दुसरा टप्पा) : १४.६ किमी

    बेलापूर-सीवूड-उरण : एकूण २७ किमी, खर्च : २९७३.३५ कोटी

    मुंबई उपनगरीय रेल्वे

    रेल्वे – मार्ग – स्थानक – रेल्वे रूळ (किमी)

    मध्य रेल्वे – सीएसएमटी – कल्याण + कसारा + खोपोली – ५१ – १८२

    पश्चिम रेल्वे – चर्चगेट-डहाणू रोड – ३७ – १२४

    हार्बर रेल्वे – सीएसएमटी – पनवेल + वडाळा + गोरेगाव – ३५ -६६

    ट्रान्स हार्बर – ठाणे – वाशी + नेरुळ – १६ – २३

    *बीएसयू मार्ग – नेरुळ – खारकोपर + उरण – ८ -१४.६

    (स्रोत : मध्य रेल्वे उपनगरी रेल्वे अहवाल)

    काम पूर्ण पण बॅनर छापायला वेळ नाही म्हणून दिघा रेल्वे स्टेशनचं लोकार्पण थांबवलं | आदित्य ठाकरे

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed