• Sat. Sep 21st, 2024

उत्साह नडला, सूचना देऊनही रॅली, पोलिसांनी गाड्या जप्त करून केदार समर्थकांवर गुन्हे दाखल केले

उत्साह नडला, सूचना देऊनही रॅली, पोलिसांनी गाड्या जप्त करून केदार समर्थकांवर गुन्हे दाखल केले

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : जामीन मिळाल्यानंतर तुरुंगातून बाहेर येत मोठी रॅली काढणे आणि शहरात शक्तिप्रदर्शन करणे काँग्रेसचे दिग्गज नेते तथा माजी मंत्री सुनील केदार यांच्यासह त्यांच्या समर्थकांना भोवले आहे. पोलिसांनी याप्रकरणी केदार व त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करीत रॅलीत सहभागी झालेल्या पाच ते सात गाड्या जप्त केल्या आहेत. इतकेच नाही तर गुरुवारी या गुन्ह्यांत एका नव्या कलमाची वाढ झाली.

विनापरवानगी रॅली काढून वाहतूककोंडी निर्माण करण्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यात गुरुवारी भादंविच्या कलम १५३ (अ)ची भर पडली. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १५० कोटी रुपयांच्या गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी २२ डिसेंबर रोजी नागपूरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सुनील केदार आणि इतर पाच आरोपींना शिक्षा सुनावली आहे. यात त्यांना नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर बुधवारी दुपारी त्यांची कारागृहातून सुटका होताच कारागृहापासून नागपूरच्या संविधान चौकापर्यंत केदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत विनापरवानगी रॅली काढली. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा नोंदविला. नागपूर पोलिसांनी सुनील केदार यांच्याविरोधात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये गंभीर आरोप केलेत.

पूर्वसूचनेनंतरही गर्दी

नागपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये अनेक दिवसांपासून जहाल नक्षलवादी आणि काही दहशतवादी कैदेत आहेत. असे असतानाही सुनील केदार व त्यांच्या समर्थकांनी कारागृहातून सुटका होताना त्यांच्या जेलच्या समोरील परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. केदार कारागृहात असताना एक दिवस अगोदरच कार्यकर्त्यांना जेलच्या परिसरात गर्दी करण्यात येऊ नये, अशी सूचना पोलिसांनी दिली होती. त्यानंतरही समर्थकांनी गर्दी करीत घोषणाबाजी केली, असे गुन्ह्यात नमूद करण्यात आले आहे.

ललित पत्की यांच्याविषयी

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed