• Mon. Nov 25th, 2024
    शरद मोहोळ याच्या हत्येनंतर स्वाती मोहोळ यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, म्हणाल्या…

    पुणे : कोथरुडमध्ये शुक्रवारी दुपारच्या वेळी कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली असून सात ते आठ जणांना अटक करण्यात आलेली आहे. शरद मोहोळ याच्यावर साहिल उर्फ मुन्ना पोळेकर यानं इतर साथीदारांनी गोळीबार केला होता. याच्यात शरद मोहोळचा मृत्यू झाला होता. आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात होते. यावेळी स्वाती मोहोळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

    स्वाती मोहोळ यांची न्याय देण्याची मागणी

    शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी यांनी न्याय मिळावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. स्वाती मोहोळ या भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या पदाधिकारी देखील आहेत. आज फडणवीस पुण्यात आले असताना स्वाती मोहोळ यांनी भेट घेतली.
    किरण मानेंनी मातोश्रीवर जाऊन बांधलं शिवबंधन; उद्धव ठाकरेंचं सर्वांदेखत वचन, म्हणाले…

    पाळत ठेवत संपवलं

    शरद मोहोळ याचा त्याच्या लग्नाच्या वाढदिवशीच खून करण्यात आला होता. शरद मोहोळ याच्यासोबत काही दिवस साथीदार म्हणून काम कारणाऱ्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि इतर दोघांनी गोळीबार केला. साहिल मुन्ना यानं काही दिवस शरद मोहोळ याच्यावर पाळत ठेवली होती. आरोपींनी या गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल तीन महिन्यांपूर्वीच खरेदी केल्याची माहिती आहे. तर, साहिल पोळेकर गेल्या एक ते दीड महिन्यांपासून शरद मोहोळसोबत काम करत होता. साहिल पोळेकर यानं त्याचा मामा नामदेव कानगुडे याच्यासोबत दहा वर्षापूर्वी शरद मोहोळच्या झालेल्या वादाचा बदला घेतला.

    शरद मोहोळ आणि नामदेव कानगुडे या दोघांच्यात दहा वर्षापूर्वी सुतारदरा येथे वाद झाला होता. त्यानंतर नामदेव कानगुडेला सुतारदरा सोडावं लागलं होतं.
    एकनाथ शिंदेंची संवेदनशीलता, भेटीसाठी धडपडणाऱ्या वृद्ध दाम्पत्याचा प्रश्न सोडवला, हक्काचं घर पुन्हा मिळवून दिलं

    गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल

    साहिल पोळेकर आणि इतर साथीदारांनी शरद मोहोळवर जो गोळीबार केला ते ठिकाण देखील सीसीटीव्हीच्या कक्षेत येत असल्यानं गोळीबार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
    मराठी माणूस इतिहास विसरुन रिल्समध्ये अडकतोय ते कलाकारांना महत्त्वाचा सल्ला, राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *