• Mon. Nov 25th, 2024
    कल्याण जिल्हा झाला पाहिले आणि तो होणारच; भाजप आमदार किसन कथोरे

    कल्याण : समितीने अहवाल दिला आहे की कल्याण जिल्हा झाला पाहिले आणि तो होणारच, असे वक्तव्य आमदार किसन कथोरे यांनी केले आहे. ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र कल्याण जिल्हा तयार करावा, अशी मागणी आणि यासाठी पाठपुरावा भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी केला आहे.

    ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, मुरबाड आणि अंबरनाथ असे चार तालुके कल्याण तालुक्याला जोडलेले असून कल्याण शहर हा सगळ्यांचा केंद्रबिंदू आहे. शिवाय आरटीओ, प्रांताधिकारी, न्यायालय, प्रादेशिक पोलीस विभाग अशी अनेक सरकारी कार्यालये कल्याण शहरात आहेत. त्यामुळे सगळ्याच दृष्टीने कल्याण सोयीस्कर पडत असून कल्याण हा स्वतंत्र जिल्हा झाल्यास त्याचा लाखो लोकांना फायदा होईल, न्याय मिळेल, असे किसन कथोरे म्हणाले.तसेच समितीने अहवाल दिला आहे की कल्याण जिल्हा झाला पाहिले आणि तो होणारच, मुख्यमंत्री याबाबत लवकर निर्णय घ्यावा, असे कथोरे यांनी सांगितले.

    २२ जानेवारीला सुट्टी घोषित करावी

    अयोध्येत येत्या २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिरातील राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. याची जय्यत तयारी देखील सुद्धा चालू आहे. त्यामुळेच २२ जानेवारीला सुट्टी घोषित करावी, अशी मागणी भाजप आमदार कथोरे य मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे आणि त्याबाबतचे पत्र सुद्धा दिले आहे.

    लोकसभा निवडणूक लढणार नाही

    लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे आमदार कथोरे यांनी सांगितले. मतदार संघात बरीच कामे बाकी आहेत त्यामुळे केंद्रात जायची इच्छा नाही, असे ते म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed