• Sat. Sep 21st, 2024

मुंबईत वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तोडफोड; पोलिसांकडून गुन्हा दाखल

मुंबईत वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तोडफोड; पोलिसांकडून गुन्हा दाखल

मुंबई: वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या चुनाभट्टी येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या महाविद्यालयात ३० ते ४० जणांच्या जमावासह ताबा धरल्याप्रकरणी कराड येथील मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे जनरल सेक्रेटरी अभिजित मोकाशी आणि व्हाईस प्रेसिडेंट विश्वजित मोकाशी यांच्यावर वडाळा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या वडाळा पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी की , चुनाभट्टी येथील वसंतदादा पाटील प्रतिष्ठान च्या इंजिनिअरिंग महाविद्यालयात २६ॲागस्टला विश्वजित मोकाशी , अभिजित मोकाशी, शेखर पाटील , हनुमंत फाळके आणि अशोक मांढरे यांच्यासह ४० ते ५० जणांच्या गटाने हल्ला केला.

जमावापैकी काहीजणांकडून महाविद्यालयात उपस्थित असणाऱ्या प्रा.रणजित मोरे यांना मारहाण करण्यात आली .तसेच महाविद्यालयाच्या रिसेप्शनमधून चाव्या हिसकावून घेतल्या. तसेच ट्रस्टी ऑफिसचे कुलूप तोडून जमाव आतमध्ये शिरला. या जमावाने महाविद्यालयातील सीसीटीव्ही ,डीव्हिआरची तोडफोड केली . त्याच दरम्यान १०० क्रमांकावर ही माहिती पोलिसांना कळवण्यात आल्याने पोलिस तात्काळ महाविद्यालयात पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला .

यासंदर्भात वडाळा पोलिस स्टेशन मध्ये भारतीय दंडसंहिता कलम ४१८, १४१, १४३, १४७, १४९, ५९४, ५०६, ३२३, ४२७ आणि ४५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . कलम ४५२ हे कलम घुसखोरी करून ताबा घेण्याचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यासाठी लावले जाते. हा अजामीनपात्र असताना गुन्हेगारांना अद्याप अटक का करण्यात आली नाही, असा सवाल फिर्यादी रणजित मोरे यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed