• Sat. Sep 21st, 2024
३२ हजार लोक एकाच दिवशी कार्यालयात, त्यांची सोय काय केलीये? जगताप यांचा सवाल

पुणे : पुरंदर तालुक्यामध्ये ३२ हजार बोगस मतदारांची नोंद असल्याचा आरोप माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी नुकताच केला होता. आमदार संजय जगताप यांना थेट लक्ष्य करत त्यांनी हा आरोप केला. तसेच शिवतारेंनी आमदार संजय जगताप आणि विश्वजित कदम यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. यावरून आता आमदार संजय जगताप आक्रमक झाले असून शिवतारे यांच्या आरोपांना जगताप यांनी थेट उत्तर दिले आहे. राज्यात बाजार बुणग्यांची संख्या अधिक झाली असून विजय शिवतारे हा बाजार बुणगा आहे, अशी खरमरीत टीका आमदार जगताप यांनी केली.

विजय शिवतारे यांनी केलेल्या आरोपांना सासडमध्ये संजय जगताप यांनी जशास तसे उतर दिले. पुरंदर विधानसभा मतदारसंघांमध्ये ३२ हजार बोगस मतदार नोंदी असल्याचा आरोप विजय शिवतारे यांनी केला होता. यानंतर आता पुरंदरचे आमदार संजय जगताप हे देखील आक्रमक झाले आहेत.

शेतकऱ्यांसमोर जगण्याचा प्रश्न, अस्वस्थ शेतकऱ्यांकडे सरकार ढुंकुणही पाहत नाही, शरद पवारांचा हल्लाबोल
३२ हजार लोकांना निवडणूक आयोगाच्यावतीने नोटीस देण्यात आलेल्या आहेत. त्यांना चार जानेवारीला सासवड येथे बोलण्यात आले आहे. याचा जाब आमदार संजय जगताप यांनी आज पुरंदर तालुक्यातील तहसील कार्यालयात जाऊन निवडणूक विभागाला विचारला.

बत्तीस हजार लोक एकाच दिवशी येणार असतील तर त्यांच्यासाठी काय सोय केली आहे? असा सवाल त्यांनी यावेळी विचारला. तर यापूर्वीच आम्ही याबाबतची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र याच्यावर कोणती कारवाई झाली? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Sharad Pawar: नगरसाठी पवार नव्या खेळीच्या तयारीत; उद्यापासून शिर्डीत ‘राष्ट्रवादी’चे शिबिर

शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष आणि युवक तालुका अध्यक्ष या दोघांच्याही कुटुंबीयांची नावे दोन गावात असून त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही? असा थेट सवाल संजय जगताप यांनी विचारला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed