• Sat. Sep 21st, 2024
हृदय उजवीकडे, पित्ताशय डाव्या बाजूला; मुंबईतील रुग्णालयात महिलेवर दुर्बिणीने शस्त्रक्रिया

मुंबई : शरीरात सामान्यांच्या तुलनेत विरुद्ध अवयवरचना असलेल्या (साइटस इनवर्सस टोटलिस) एका महिलेचे पित्ताशय उजव्याऐवजी डाव्या बाजूला होते. दुर्बिणीद्वारे (लेप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी) अतिशय आव्हानात्मक शस्त्रक्रिया करून हे पित्ताशय काढण्यात आले.

अत्यंत कुशलतेने ही शस्त्रक्रिया केल्यानंतर आठ दिवसांच्या वैद्यकीय देखरेखीअंती तिला घरी सोडण्यात आले. या महिलेची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

सांताक्रूझ पूर्व येथील व्ही. एन. देसाई या पालिका रुग्णालयात मागील पंधरवड्यात ३५ वर्षीय महिला दाखल झाली. स्थूल प्रकृतिमान असलेली ही महिला पोटदुखीने त्रस्त होती. पित्ताशयाच्या पिशवीला आलेली सूज आणि पित्ताशयामध्ये तयार झालेल्या असंख्य खड्यांमुळे तिला पोटदुखी होत असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.

पुण्यात तरुणीशी विवाह, येमेनचा युवक गुन्ह्यात अडकला, आता हायकोर्टाचे महत्त्वाचे आदेश

या महिलेचे पोटामधील अवयव विरुद्ध दिशेला होते. हृदय उजव्या बाजूला, यकृत उजव्याऐवजी डाव्या बाजूला, आतडे (अपेंडिक्स) उजव्याऐवजी डाव्या बाजूला होते. तसेच, पित्ताशय डावीकडे होते.

श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनाला जाताय? नववर्षानिमित्त मंदिराच्या वेळेत मोठा बदल
पित्ताशयाला आलेली सूज आणि असंख्‍य खडे यांमुळे या महिलेवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. मात्र, ‘साइटस इनवर्सस टोटलिस’मुळे शस्त्रक्रिया करणे जोखमीचे आणि गुंतागुंतीचे होते. त्यातच स्थूलता आणि फुप्फुसाची नाजूक स्थिती यांमुळे डॉक्टरांपुढे मोठे आव्‍हान निर्माण झाले होते.

31st ला झिंगाट ग्राहकांना घरी सोडा, वाहतूक शाखेचे हॉटेल-बार चालकांना निर्देश, पर्यायही सुचवले

प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरबंससिंग बावा यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर दीक्षित आणि त्यांचे सहकारी डॉ. रितू नंदनीकर, डॉ. राहुल महेश्वरी, भूलतज्ज्ञ डॉ. किरण, डॉ. प्रियांका जगावकर यांच्या चमूने दुर्बिणीच्या साह्याने पित्ताशय काढण्याची ही अवघड शस्त्रक्रिया केली.

पत्नीची प्रसूती सिझेरियन झाली; पतीने त्यानंतर थेट स्वतःची नसबंदी केली

Read Latest Maharashtra Updates And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed