अमरावती चांदूर बाजार मार्गावर आज सायंकाळी सात वाजताच्या सुमारास सिमेंट मिक्सर ट्रक क्रमांक एम एच शून्य चार २१ ०७ हे चांदूर बाजारच्या दिशेने जात होते. ऑटो आणि टिप्परची जोरदार धडक झाली या घटनेत दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी धावा धाव करत मोबाईलचा उजेड करत अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना मदतीचा हात दिला व तात्काळ रुग्णवाहिकेला पाचारण केले. या दुर्दैवी आणि भीषण अपघातात चिंचोली येथील साठ वर्षीय पद्माकर देविदास दांडगे आणि छकुली सहदेव वाकोडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या घटनेत चिंचोली येथील करुणा साहेबराव वाकोडे, पूजा साहेबराव वाकोडे, फुलंन साहेबराव वाकोडे, साहेबराव किसनराव वाकोडे व रजनी गौतम दांडगे यांच्यावर अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती नागरिकांच्या सतर्कतेमुळे जखमींना तात्काळ औषधोपचार मिळू शकला.
अमरावती शहराच्या चहुबाजूने खाजगी स्तरावर लँड डेव्हलपिंग चे काम सुरू आहे त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर कॉर्पोरेट कंपन्यांचे गित्ती बोल्डर, जेसीबी, सिमेंट मिक्सर विनारोकटोक भरधाव धावताना दिसत आहे.
यापूर्वी शहरातील बियाणी चौकात अशाच प्रकारे भरदाव टिप्परच्या धडकेत महिला पोलीस अधिकाऱ्याचा पाय धडा वेगळा झाला होता मात्र तरीसुद्धा अमरावती आयुक्तालयातील पोलीस प्रशासन शहरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्था सुस्थितीत करण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News