• Mon. Nov 25th, 2024
    सलग १० सिलेंडरचे स्फोट, पुणे पुन्हा एकदा हादरलं, विमाननगरमध्ये अग्नितांडव, नेमकं काय घडलं?

    पुणे : विमाननगर भागातील रोहन मिथिला इमारतीच्या परिसरात बांधकाम मजुरांच्या वसाहतीत बुधवारी दुपारी आग लागली. तात्पुरत्या बांधण्यात आलेल्या घरांमध्ये ठेवलेल्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे स्फोट झाले. एकापाठोपाठ दहा सिलिंडरचे स्फोट झाल्याने घबराट उडाली होती.

    विमाननगर भागातील सिम्बॉयसिस कॉलेजजवळ रोहन मिथिला इमारत आहे. या परिसरात नियोजित गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. तेथे बांधकाम मजूर राहायला आहेत. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास बांधकाम मजुरांच्या वसाहतीत (लेबर कॅम्प) आग लागली. आग लागल्यानंतर घरातील गॅस सिलिंडरचे स्फोट झाले. स्फोटानंतर परिसरात घबराट उडाली. वसाहतील महिला आणि मुले बाहेर पळाल्याने बचावली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.

    जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वसाहतीतील छोट्या घरात जवळपास १०० सिलिंडर ठेवण्यात आले होते. त्यापैकी दहा सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
    दरम्यान, गॅस सिलिंडरचे एकापाठोपाठ स्फोट झाल्याने परिसरात घबराट उडाली. स्फोटामुळे परिसरात अफवा पसरली होती. आगीत बांधकाम मजुरांची घरे जळाली. गृहोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले.

    पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाला या घटनेसंदर्भातील माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. मिळालेल्या माहितीनुसार जिथं आग लागली आणि स्फोट झाले त्या ठिकाणी १०० सिलेंडर ठेवलेले होते. त्यापैकी १० सिलेंडरचे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून कुलिंगचं काम सुरु करण्यात आलं आहे.
    अमोल कोल्हेंवर दादा ब्रिगेडचा हल्ला, काल गळ्यात गळे, आज आव्हानाची भाषा, अण्णांनी दंड थोपटले

    बेकायदेशीर रित्या सिलेंडरचा साठा ?

    विमाननगरमध्ये ज्या ठिकाणी आग लागली तिथं १०० सिलेंडरचा साठा करण्यात आला होता. हा साठा बेकायदेशीर रित्या करण्यात आल्याची माहिती आहे. पुण्यातील विमाननगरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर सिलेंडर का एकत्र ठेवण्यात आले होते हा प्रश्न निर्माण झाला आहे.
    नव्या टर्मिनलचे उड्डाण ‘हवेत’च, पुणेकरांच्या नशिबी हालअपेष्टा; कसे आहे नवे टर्मिनल?

    ऑक्टोबरमध्ये पिंपरी चिंचवडमध्येही सिलेंडर स्फोट

    पुण्यातील विमाननगरमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली. अशाच प्रकारची आग ऑक्टोबर महिन्यात पिंपरी चिंचवडमध्ये लागली होती.

    डिजिटल युगाशी संबंध नसलेला वयस्कर नेता गुडघ्याला बाशिंग बांधून बसलाय; अमोल कोल्हेंची आढळराव पाटलांवर टीकाRead Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed