• Sat. Sep 21st, 2024
‘नाशिक मर्चंट’साठी उद्या होणार मतदान; १९ जागांसाठी चुरस, दोन जागा बिनविरोध

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : दि. नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या २०२३ ते २०२८ या पंचवार्षिक कालावधीसाठी रविवारी (दि. २४) मतदान होणार असून, त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. २१ पैकी १९ जागांसाठी मतदान होत असून, महिला गटासाठीच्या दोन जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत.

या निवडणुकीत सर्वसाधारण गटाच्या १८ जागांसाठी २४ उमेदवार, तर अनुसूचित जाती-जमातीच्या एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीच्या रिंगणात एकूण २७२ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत २८ उमेदवार रिंगणात उरले. त्यापैकी २१ उमेदवार सत्त्रूढ प्रगती पॅनलचे, संदीप भवर सहकार पॅनलचे व सहा उमेदवार इतर गटातील आहेत. जेथे बँकचे सभासद आहेत अशा ३१४ ठिकाणी मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार असून, सोमवारी (दि. २५) मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी फयाज मुलानी यांनी दिली.

जितेंद्र आव्हाड भांबावलेत, आमच्यावर राग काढतात, शिंदेंवर राग काढावा ; वडेट्टीवारांचा संताप

प्रगती पॅनलचे उमेदवार

सोहनलाल भंडारी, वसंत गिते, विजय साने, गणेश गिते, नरेंद्र पवार, प्रफुल्ल संचेती, अविनाश गोठी, भानुदास चौधरी, आकाश छाजेड, रंजन ठाकरे, प्रकाश दायमा, हेमंत धात्रक, सुभाष नहार, देवेंद्र पटेल, महेंद्र बुरड, ललितकुमार मोदी, हरीश लोढा, अशोक सोनजे ( सर्वसाधारण गट), प्रशांत दिवे (अनुसूचित जाती-जमाती राखीव), सपना बागमार, शीतल भट्टड ( महिला बिनविरोध).

सहकार पॅनलचे उमेदवार : संदीप भवर (सर्वसाधारण गट). इतर उमेदवार : महेंद्र गांगुर्डे, सुधाकर जाधव, संजय नेरकर, विजय बोरा, कपिलदेव शर्मा (सर्वसाधारण गट), विलास जाधव (अनुसूचित जाती-जमाती राखीव).

निवडून द्यायच्या संचालकांची संख्या
सर्वसाधारण गट १८
अनुसूचित जाती-जमाती १
एकूण १९

आकडे बोलतात…
१ लाख ८५ हजार ८८७ वैयक्तिक मतदार
२ हजार ७५१ ‘फर्म’ मतदार
१ लाख ८८ हजार ६३८ एकूण मतदार
३१४ एकूण मतदान केंद्रे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed