• Sat. Sep 21st, 2024

रेमडेसिव्हीर इंजेक्शन खरेदी प्रकरण,आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाची चौकशी, गुन्हा दाखल

रेमडेसिव्हीर इंजेक्शन खरेदी प्रकरण,आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाची चौकशी, गुन्हा दाखल

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: करोनाकाळातील रेमडेसिव्हीर इंजेक्शन खरेदीतील घोटाळा आरोपप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौकशीचा फास आवळला आहे. पोलिसांनी बुधवारी या प्रकरणात शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या पुण्यशाली पारीख यांची चौकशी केली. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई पालिकेने रेमडेसिव्हीर इंजेक्शनची खरेदी इतर सरकारी यंत्रणांच्या तुलनेत सुमारे ९०० रुपये चढ्या दराने केल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले होते. या माहितीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेने ऑक्टोबरमध्ये भादंवि कलम ४०६ (फौजदारी विश्वासघात), ४२० (फसवणूक), १२० (कट रचणे) व ३४ (सामायिक गुन्हेगारी कृत्य) कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. सुमारे ६५ हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन चढ्या भावाने खरेदी केल्याचा आरोप असून पाच कोटी ९६ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार आहे. मध्यवर्ती खरेदी विभागातील तत्कालीन अधिकारी, मायलान लॅबोरेटरीचे संचालक व इतरांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले. करोनाकाळात रेमडेसिव्हीर ६५० रुपये प्रतिकुपी दर होता. पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी विभागाने १५६८ रुपये दराने खरेदी केली होती.

लोकसभेत तीन महत्त्वाच्या फौजदारी विधेयकांना मान्यता, अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा

रेमडेसिव्हीर इंजेक्शन पुरविण्याचे कंत्राट देण्याबाबत महापौर बंगल्यावर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पालिकेचे अधिकारी, डॉक्टर तसेच इतर संबंधित व्यक्ती उपस्थित होत्या. या विषयाचा काहीच संबंध नसताना पुण्यशाली पारीख यांचीदेखील उपस्थिती होती. राजकीय क्षेत्रात व्यक्तीचा परिचय असल्याने अमूक कंपनीला कंत्राट मिळावे यासाठी पारीख यांची उपस्थिती होती असा आरोप आहे. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने पारीख यांना समन्स धाडण्यात आले होते. त्यानुसार पोलिस आयुक्त कार्यालयात त्यांची बुधवारी काही तास चौकशी करण्यात आली. चौकशीचा नेमका तपशील मात्र समजू शकला नाही.

आपलं कुटुंब आपली जबाबदारी, सगळी कंत्राटं सोयऱ्यांच्या घरी ; शिंदेंकडून ठाकरेंवर आरोपांच्या फैरी

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed