• Sat. Sep 21st, 2024

Corona Update: जे एन-१ नव्या विषाणूचा रुग्ण सिंधुदुर्गात सापडला; आरोग्य यंत्रणा अलर्टवर

Corona Update: जे एन-१ नव्या विषाणूचा रुग्ण सिंधुदुर्गात सापडला; आरोग्य यंत्रणा अलर्टवर

सिंधुदुर्ग: कोरोनाच्या महामारीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नव्या विषाणूने डोकं वर काढल्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिक सतर्क झाले असून आरोग्य यंत्रणा ही सतर्क झाली आहे.जे एन 1 या नव्या विषाणूचा रुग्ण सिंधुदुर्गात आढळल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली पाहायला मिळते.दोडामार्ग तालुक्यामध्ये कोरोनाच्या प्रकारातील जेएन .१ या नव्या उपप्रकाराचा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मात्र, हा रुग्ण पूर्णपणे बरा असून कुणी घाबरून जाऊ नये असे आरोग्य प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गोव्यातील आरोग्य विभागाने सिंधुदुर्ग आरोग्य विभागाकडे दिलेल्या माहितीनुसार हा रुग्ण दोडामार्ग तालुक्यातील एका ४१ वर्षीय पुरुष २० नोव्हेंबर २०२३ दरम्यान गोवा येथे केलेल्या कोरोना चाचणी मध्ये कोरोनाच्या जेएन. १ या नव्या प्रकारातील पॉझिटिव्ह आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध झाली आहे. मात्र या चाचणीला आता एक महिना होऊन गेला असून तो रुग्णही पूर्णपणे बरा असून घरी आहे.

तरीदेखील आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिव्हिल सर्जन डॉ. श्रीपाद पाटील यांनी माहिती दिली.मात्र जिल्ह्यामध्ये या नव्या विषाणूचा रुग्ण आढळल्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य विभागाला सतर्क राहण्याचे आदेश सिव्हिल सर्जन यांनी दिलेले आहेत.

दगडी फुटपाथ अन् मोठे स्लॅब; पाण्याखाली सापडलं ३७५ वर्ष जुनं रहस्यमय शहर, अखेर गूढ उकललं
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed