• Sat. Sep 21st, 2024
गुड न्यूज, पुणे विभागातील विशेष रेल्वे गाड्यांच्या ४५५ फेऱ्या वाढवल्या, जाणून घ्या अपडेट

म. टा. प्रतिनिधी, पुणे: प्रवाशांची वाढती गर्दी, आरक्षणाची प्रतिक्षा यादी, पाहता प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे विभागातून धावणाऱ्या विशेष रेल्वेच्या गाड्यांच्या ४५५ फेऱ्या वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना अतिरिक्त गाड्या उपलब्ध होणार असून, गैरसोय टळणार आहे. साधारण पुढील तीन महिन्यांपर्यंत या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. या सर्व गाड्यांच्या वेळा, थांबेमध्ये बदल नाही. या गाड्यांच्या तिकिट आरक्षणाला २२ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

मध्य रेल्वे पुणे विभागातील विशेष गाड्यांचा प्रवास कालावधी ४५५ फेऱ्यांकरीता तपशील

पाटगाव धरणाचं पाणी अदानींच्या जलविद्युत निर्मिती केंद्राला देण्यास विरोध,गारगोटीत गावकऱ्यांचं ठिय्या आंदोलन– पुणे-अमरावती (०१४३९) – व्दिसाप्ताहिक विशेष ट्रेन ३१ मार्चपर्यंत दर शुक्रवार आणि रविवारी असेल (२६ फेऱ्या वाढविल्या)
– अमरावती-पुणे (०१४४०)- व्दिसाप्ताहिक विशेष ट्रेन एक एप्रिलपर्यंत दर शनिवार आणि सोमवारी असेल. (२६ फेऱ्या वाढविल्या)
– कोल्हापूर-पुणे स्पेशल (दररोज) (०१०२४) : ३१ मार्च पर्यंत असेल. (९१ फेऱ्या वाढविल्या)
– पुणे-कोल्हापूर विशेष (दररोज) (०१०२३) : ३१ मार्च पर्यंत असेल. (९० फेऱ्या वाढविल्या)
– नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष (०२१४४) : दर गुरुवारी १५ फेब्रुवारीपर्यत धावेल ( ७ फेऱ्या)
– पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष (०२१४३) : दर शुक्रवारी १५ फेब्रुवारीपर्यंत धावेल ( ७ फेऱ्या)
– पुणे-हरंगुळ आणि हरंगुळ-पुणे विशेष (दररोज- ३१ मार्चपर्यंत चालविण्यात येणार (प्रत्येकी ९१ फेऱ्या)
– सोलापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस-सोलापूर साप्ताहिक विशेष- २६ मार्चपर्यंत धावेल (१३१फेऱ्या)
करोनाच्या JN1चा अलर्ट! ठाण्यातील नव्या व्हेरिंएटचा पहिल्या रुग्णाची प्रकृती चिंताजनक

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना दिलासा

मध्य रेल्वेनं पुणे विभागातून सुटणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांना पुढील तीन महिने मुदतवाढ दिलेली आहे. यामुळं महाराष्ट्र राज्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. पुणे- अमरावती, कोल्हापूर-पुणे, नागपूर-पुणे, पुणे हरंगुळ, आणि सोलापूर एलटीटी या दरम्यानच्या गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळं पुढील तीन महिने या मार्गावरुन रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या गाड्यांचे तिकीट आरक्षण येत्या दोन दिवसात सुरु होणार आहे.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, १२ लाखांचे कोकेन जप्त, विदेशी व्यक्तीला अटक

पुणे लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीनंतर आता शिवसेना ठाकरे गट मैदानात

Read Latest Maharashtra News And Marathi News

Shrikrishna kolhe यांच्याविषयी

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed