• Sat. Sep 21st, 2024

मुलीचा भलताच प्लॅन, २ लाख घेऊन लग्न, नांदण्यास नकार, धमकी देत पलायन, पोरगा कुठे फसला?

मुलीचा भलताच प्लॅन, २ लाख घेऊन लग्न, नांदण्यास नकार, धमकी देत पलायन, पोरगा कुठे फसला?

दौंड: लग्नाचा खोटा बनाव रचून दोन लाख रुपयांची फसवणूक करून विवाहित वधू फरार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना दौंड तालुक्यातील देलवडी येथील एका ३० वर्षीय युवकासोबत घडली आहे. याप्रकरणी विवाहित वधुसह आठ जणांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
महाराष्ट्रातील १९ ठिकाणी एनआयएच्या धाडी; मोठा कट उधळला, अमरावतीतून धक्कादायक माहिती समोर
मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाचा खोटा बनाव रचून चित्रा कैलास अंभोरे या नाशिक येथील फरार झालेल्या वधूने दौंड तालुक्यातील देलवडी येथील युवकाला आणि त्याच्या कुटुंबियांना फसवले आहे. दरम्यान देलवडी येथील ३० वर्षीय युवक आणि चित्रा अंभोरे यांचा नाशिक येथील श्री साई वैदिक विवाह संस्था येथे विवाह झाला. त्यावेळी साडू यशवंत जाधव याने दोन लाख रुपये फसवणूक झालेल्या कुटुंबाकडून घेतले होते. विवाह झाल्यानंतर यांच्यात वादावादी झाली. दरम्यानच्या गुन्ह्यामध्ये मारुती सुझुकी कंपनीची ईरटीका गाडी वापरण्यात आली.

गुन्हेगारांना अटक करण्याची प्रक्रिया यवत पोलीस ठाण्यात चालू असून लवकरच गुन्हेगारांना अटक केले जाईल, अशी माहिती तपासी अंमलदार पोलीस निरीक्षक आकाश शेळके यांनी दिली. दरम्यान देलवडी येथील युवकाचे लग्न लाऊन देऊ असा खोटा बनाव करून दोन लाखांची फसवणूक करून विवाहित वधू फरार झाली. शिवाय ती नांदणार नसून जाताना कुटुंबियांना दमदाटी करून गेली. या घटनेमुळे घाबरलेल्या वरासह कुटुंबियांनी यवत पोलीस ठाण्यात धाव घेतली.

गुन्हे मागे घेतो म्हणता, मग अटक करता, डाव काय तुमचा? जरांगेंचा सरकारला सवाल

दाखल फिर्यादीवरून यवत पोलिसांनी बाबु चव्हाण (रा.यवत ता. दौंड, सिंधु माळी (रा.कोरेगांवभिमा ता.शिक्रापुर, सांडु यशवंता जाधव (रा.मढ ता.जि.बुलढाणा), सतिष मधुकर जोशी (रा. अशोकनगर सातपुते नाशिक, चित्रा कैलास अंभोरे (रा. मनमाड रामलालनगर ता.नांदगांव जि. नाशिक), आशा नानासाहेब निकम (रा. जेलरोड नाशिक), ज्योती रविंद्र लोखंडे (रा.चाचडगांव ता. दिंडोरी जि. नाशिक, मेघा गोपाल सोळखी (रा. पंचवटी नाशिक), आकाश दिनेश कोटे (रा.देवळालीगांव फुलेनगर नाशिक या सर्वांविरूध्द यवत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार नगरे आणि पोलीस निरीक्षक शेळके करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed