• Sat. Sep 21st, 2024
प्रश्न अदानीला, उत्तर चमच्यांचं, सेटलमेंटसाठी आमच्यासोबत भाजप नव्हतं, उद्धव ठाकरेंची टोलेबाजी

नागपूर : शिवसेनेसह (उद्धव बाळासाहेब ठाकरे) इतर विरोधी पक्षांनी मिळून धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाविरुद्ध मोर्चा काढला होता. त्या मोर्चावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेणारी ही मंडळी अदानींचे चमचे आहेत, असा टोला सोमवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना लगावला.

धारावी प्रकल्पाविरुद्ध काढलेल्या मोर्चामधील माणसे केवळ धारावीतील नव्हती, हा मोर्चा सेटलमेंट मोर्चा होता, अशी टीका ठाकरेंवर होत आहे. या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले,‘आम्ही मुंबईतून नाही तर चंद्राहून माणसे आणली. या मोर्चात फक्त भाजपची माणसे नव्हती. ते असते तर सेटलमेंट झाली असती.’ मुंबई विकण्यासाठी काही लोक अदानींची चमचेगिरी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्या दिल्ली येथे जाणार आहे. बैठकीचा अजेंड उद्या कळेल, असेही त्यांनी सांगितले.

Uddhav Thackeray : राज्यातील सरकार अदानींच्या दारी, करोनाशी लढलेली धारावी झुकणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
आमच्याकडे पुरावे मग एसआयटी का नाही?

सलीम कुत्ता संदर्भात आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत विषय मांडताच एसआयटी लावली. पण, आमच्याकडे याच कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन नाचतानाचा पुरावा आहे. हे पुरावे सभागृहात दाखविल्यानंतरही सरकार आम्हाला बोलू देत नाही. आमच्याकडे असलेल्या पुराव्याच्या आधारे एसआयटी लावण्यात यावी, असे ठाकरे म्हणाले.

दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी चौकशीच्या हालचाली, ठाकरे गटाने थेट शाहांवर आरोप असलेलं प्रकरण उकरलं
छत्रपतींची शपथ घेणाऱ्यांनी चर्चा करू नये

छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेणाऱ्यांनी आता मराठा आरक्षणावर चर्चा करू नये. तर मराठा आरक्षण कसे देता येईल, हे सांगावे. तसेच कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल तर सरकारच्या भूमिकेला आमचा पाठिंबा राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

धारावी पुनर्विकास प्रकल्पात कोणत्याही एका व्यक्तीचा नव्हे तर सामान्य माणसाचा फायदा होईल: एकनाथ शिंदे
पंतप्रधान गुजरातचेच आहेत का?

गुजरातध्ये सूरत डायमंड बोर्स सुरू झाला आहे. त्याचा फटका मुंबईतील हिरे व्यवसायाला बसला आहे. पंतप्रधान महाराष्ट्राची आर्थिक राजधानी गुजरातला हलविण्याच्या मार्गावर आहेत. ते त्यांच्या भाषणातसुद्धा गुजरात मजबूत झाला तर देश मजबूत होईल, असे म्हणतात. ते केवळ गुजरातचेच पंतप्रधान आहेत का? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.

टीडीआर लॉबीसाठी मोर्चा, उद्धव ठाकरेंची भूमिका दुटप्पी | देवेंद्र फडणवीस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed