• Mon. Nov 25th, 2024

    जेजेतील त्वचारोग विभागप्रमुखांवर गंभीर आरोप, निवासी डॉक्टरांकडून सामूहिक रजा आंदोलनाचा इशारा

    जेजेतील त्वचारोग विभागप्रमुखांवर गंभीर आरोप, निवासी डॉक्टरांकडून सामूहिक रजा आंदोलनाचा इशारा

    मुंबई : जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी उद्या, १८ डिसेंबरपासून सामूहिक रजा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्वचारोग विभागप्रमुख आमचा अपमान करतात, चांगली वागणूक देत नाहीत, परीक्षेमध्ये नापास करण्याची धमकी देतात व मानसिक छळ करतात असा आरोप या डॉक्टरांनी केला असून त्यांनी या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाकडेही दाद मागितली आहे.

    निवासी डॉक्टरांनी रुग्णालय प्रशासनासह वैद्यकीय सचिवांना दिलेल्या पत्रामध्ये त्वचारोग विभागाच्या प्रमुखांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. रुग्णांना योग्यपद्धतीने मार्गदर्शन केले जात नाही, चुकीच्या वैद्यकीय निदानांमळे रुग्णांचा मृत्यू होतो, असे आरोप निवासी डॉक्टरांनी केले आहेत. विभागातील निवासी डॉक्टरांना केबिनमध्ये बोलावून प्रत्येक गोष्टीमध्ये अपमानित केले जाते. त्यामुळे मानसिक त्रास होतो असाही आक्षेप डॉक्टरांनी रुग्णालय प्रशासन आणि वैद्यकीय शिक्षण विभागाकडे दिलेल्या पत्रामध्ये नोंदवला आहे. या प्रकरणी न्याय मिळावा अशी अपेक्षा मार्ड या डॉक्टरांच्या संघटनेने व्यक्त केली आहे. विभागप्रमुखांनी सांगितलेल्या निर्देशांचे पालन केले नाही तर परीक्षेमध्ये नापास करू, अशीही धमकी दिली जाते असेही यात म्हटले आहे.
    पुण्यातील सरकारी रुग्णालये ‘व्हेंटिलेटर’वर; अपुऱ्या सोयी-सुविधामुळे वाढला ताण
    चौकशी समितीची स्थापना

    हे आक्षेप घेत त्वचारोग विभागातील निवासी डॉक्टरांनी सोमवारपासून सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतल्याचे पत्राद्वारे कळवले आहे. या प्रकरणी सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून निवासी डॉक्टरांना चौकशी पूर्ण होईपर्यंत सामूहिक रजेवर न जाण्याचा सल्ला देण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.

    टीम मटा ऑनलाइन यांच्याविषयी

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed