• Sat. Sep 21st, 2024

करोनाशी लढून जिंकणारी धारावी अदानीला शरण जाईल का? ठाकरेंचा सवाल

करोनाशी लढून जिंकणारी धारावी अदानीला शरण जाईल का? ठाकरेंचा सवाल

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मोर्चा धारावीत पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी धारावीच्या पुनर्विकासाचं काम अदानींना दिल्याच्या मुद्यावरुन हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंनी जमललेल्या धारावी, मुंबई आणि महाराष्ट्रप्रेमींचा धारावीसाठी संघर्ष सुरु आहे, असं म्हटलं. आज मुंबईतील मोजके कार्यकर्ते रस्त्यावर आलेलो आहोत. अदानींची दलाली घेतलीय त्या सुपारीबाजांना सांगतोय की हा आडकित्ता पाहा किती मोठा आहे. पन्नास खोके कमी पडायला लागली म्हणून धारावी आणि मुंबई गिळायला निघालेले आहेत, अशी टीका ठाकरेंनी केली. राज्यातील सरकार अदानीच्या दारी आहे. धारावीतील सर्व गोष्टींचा टीडीआर अदानींना देऊन टाकला आहे. सब भूमी अदानी की होऊ देणार नाही, असंही ठाकरे म्हणाले.

अडीच वर्ष यशस्वीपणे चालणारं सरकार गद्दारी करुन कुणी पाडलं हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. गुवाहाटीला जाण्यासाठी विमानं कुणी पुरवली असतील, हे लक्षात आलेलं असेल. उद्धव ठाकरे सत्तेवर आहेत तोपर्यंत मुंबई गिळता येणार हे लक्षात आल्यानं सरकार पाडलं की काय असं वाटू लागलंय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

२०१८ चा विषय काढतात पण जे पाप असेल ते देवेंद्र फडणवीस यांचं असेल. धारावीत सरकारी कर्मचारी वसाहत होती.वांद्रे वसाहतीतील सरकारी कर्मचाऱ्यांना तिथल्या तिथं घरं देण्याचा निर्णय आमच्या सरकारनं घेतला होता. अदानींना धारावी, विमानतळ, नवी मुंबईतील विमानतळ, रेक्लेमेशन अदानींना दिलं जात आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

धारावीतील पात्र आणि अपात्र ठरवणारी पात्र कोणती आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. करोनाशी लढून जिंकणारी धारावी अदानीला शरण जाईल का? असा सवाल उद्धव ठाकरे म्हणाले. आता हे अपात्र आहेत त्यांना मिठागरात टाकणार म्हणजे तिथली जागा देखील अदानींना दिली जाईल. मिठागर पण अदानींना देऊन टाकताय का? असा सवाल ठाकरेंनी केला.

धारावीकरांना ५०० चौरस फुटाचं घर मिळालं पाहिजे. धारावीकरांना धारावीत घरं मिळाली पाहिजेत. धारावीचा विकास सरकारनं केला पाहिजे. अदानींना ज्या सवलती दिल्या त्या इतर कोणत्या बिल्डरला दिल्या आहेत, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराजांसोबत घडला धक्कादायक प्रकार,फेसबुक पेज हॅक करुन नको त्या गोष्टींचं पोस्टिंग सुरु
मुंबई महापालिकेच्या निवडणुका घेत नाहीत. विधानसभेत आम्ही सत्तेत आल्यानंतर अदानींचं काय करायचं ते बघून घेऊ, असं उद्धव ठाकरे म्हणाले. घराला घर दिल्याशिवाय धारावीकरांना धक्का लागता कामा नये. आज धारावीच्या लढ्याची सांगता नसून लढ्याची सुरुवात आहे. पोलिसांनी पण सरकार येतं आणि जातं याची देखील नोंद घ्यावी, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
बदलीसाठी अनोखी आयडिया! कागदोपत्री घटस्फोट घेतला पण संसार सुरळीत, तक्रार येताच शिक्षिका पोलिसांच्या रडारवर
मी प्रकल्पाच्या विरोधात नाही, धारावीकर पिढ्यानं पिढ्या राहात आहेत तिथं अदानींनी एक दिवस राहून दाखवावं, असं आव्हान उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबईकरांना दिलासा, परळ टीटी उड्डाणपुलावरुन प्रवास करणं सुखकर होणार, बीएमसीकडून मोठी अपडेट
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed