• Sat. Sep 21st, 2024

दप्तरांमुळे लहान मुलांच्या मणक्यावर वजन, वाढतेय पाठदुखीची समस्या, तज्ज्ञांचा महत्त्वाचा इशारा

दप्तरांमुळे लहान मुलांच्या मणक्यावर वजन, वाढतेय पाठदुखीची समस्या, तज्ज्ञांचा महत्त्वाचा इशारा

म. टा. वृत्तसेवा, पनवेल: शाळेच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी प्रयत्न झाले, परंतु त्याला फारसे यश आलेले नाही. दप्तराचे योग्य वजन समजून घेणे, योग्य दप्तराची निवड करणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे, असे मत रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. प्रमोद भोर यांनी व्यक्त केले.

नवी मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळेत परतलेल्या मुलांमध्ये पाठदुखीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पाठदुखी टाळण्यासाठी दप्तराचा योग्य पद्धतीने वापर करणे गरजेचे आहे. पाठदुखीचा संबंध प्रौढांशी जोडला जात असला, तरी मुलांमध्येही ही समस्या सर्रास आढळून येते. पाठीवरील दप्तराचे ओझे, वर्गात किंवा घरी बसण्याची अयोग्य पद्धत आणि वारंवार फोन किंवा टॅबलेटचा वापर या गोष्टीदेखील तितक्याच कारणीभूत ठरतात. दप्तराचे वजन इयत्ता पहिली आणि दुसरीमधील मुलांसाठी १.५ ते दोन किलो, तिसरी ते पाचवीमधील मुलांसाठी दोन ते तीन किलो, सहावी ते आठवीच्या मुलांसाठी तीन ते चार किलो, तर इयत्ता नववी आणि दहावीच्या मुलांसाठी पाच किलो वजनाचे दप्तर शारीरिक क्षमतेनुसार योग्य आहे. तरीदेखील कोवळ्या मुलांच्या पाठीवर जितके वजन कमी असेल तितके चांगले, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मुलं जमली, शाळेत प्रार्थना सुरु, तेवढ्यात आरुषी कोसळली, पाहता-पाहता ११ विद्यार्थी बेशुद्ध पडले अन्…

मुलांनी दप्तर योग्यरित्या अडकवले आहे का, फोन किंवा टॅबलेट वापरताना बसण्याच्या योग्य पद्धतीचा वापर करतात का, मुलांचा आहार जीवनसत्त्व ‘ड’ आणि कॅल्शियमयुक्त आहे का, याकडे पालकांनी लक्ष द्यावे. मुलांच्या आहाराबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मुलांना पाठदुखीचा त्रास होत असेल, तर त्यांच्या पाठीवरील ओझे किंवा शाळेत बसण्याच्या स्थितीकडे विशेष लक्ष द्यावे. योग्य जीवनशैलीचे पालन आणि शारीरिक हालचालींना प्रोत्साहन दिल्याने या वेदना प्रभावीपणे दूर होऊ शकतात, असा विश्वास डॉ. भोर यांनी व्यक्त केला.

शाळेतील गणित आणि मराठीचा टॉपर विद्यार्थी, पेपरची लाईन टाकायला १५ रुपये पगार; नारायण राणेंची संघर्षगाथा

मेडिकव्हर रुग्णालयाचे डॉ. नितीश अरोरा (बालरोग ऑर्थोपेडिक सर्जन) यांनीही विद्यार्थ्यांच्या पाठीवरील जड दप्तराचे ओझे कमी करण्याविषयी मार्गदर्शन केले. दप्तरामध्ये दुहेरी पट्ट्या असाव्यात आणि दोन्ही खांद्यावर समान वजन पेलले जाईल, यासाठी मुलांच्या दोन्ही पट्ट्यांसह दप्तर सहज अडकवता आले पाहिजे, दप्तर कमरेच्या खाली लटकू नये, पाठीच्या एका बाजूला जड दप्तर अडकवल्याने मुलांच्या मणक्यावर ताण येतो, शरीराच्या एका बाजूला अतिरिक्त वजन टाळणे महत्त्वाचे आहे, असे मत डॉ. अरोरा यांनी व्यक्त केले.

शाळांची वेळ उशिरा करावी या राज्यपालांच्या सूचनेबाबत विद्यार्थी, शिक्षक अन् पालकांना काय वाटतं?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed