• Sat. Sep 21st, 2024

न्यू म्हाडा कॉलनीच्या वतीने आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन, १५० हून अधिक जणांनी घेतला लाभ

न्यू म्हाडा कॉलनीच्या वतीने आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन, १५० हून अधिक जणांनी घेतला लाभ

मुंबई : न्यू म्हाडा कॉलनी समन्वय समिती व ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १०/१२/२०२३ रोजी बाळासाहेब ठाकरे नगर येथे भव्य आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिराचा लाभ विभागातील १५० हून अधिक लोकांनी घेतला तसेच साधारण ३५ लोकांनी रक्तदान केले.

शिबिरामध्ये मधुमेह (डायबिटीस) चाचणी ६० वर्षावरील नागरिकांना कॉलनीतील कृपासिंधु सोसायटीचे अध्यक्ष श्री. उदय राणे यांनी पुरस्कृत केले तसेच मान्यवरांचा सत्कार करण्यासाठी लागणारे ५० तुळशीचे रोपटे वृंदावन सोसायटीचे अध्यक्ष कृष्णा होवाळ साहेब यांनी पुरस्कृत केले. त्यांचे समन्वय समिती व जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने मनःपूर्वक आभार. शिबिर यशस्वीपणे पार पाडावे यासाठी समन्वय समिती, म्हाडा उत्सव समिती व जेष्ठ नागरिक संघाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भरपूर मेहनत घेतली त्या सर्वांचे न्यू म्हाडा कॉलनी समन्वय समिती व ज्येष्ठ नागरिक संघाने मनःपूर्वक आभार मानले

बाळासाहेब ठाकरे नगर, न्यू म्हाडा कॉलनी समन्वय समिती व ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने व के जे सोमय्या रुग्णालय तसेच मेट्रोपोलीस संस्थेच्या सहकार्याने विभागातील नागरिकांकरिता मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर रविवार दिनांक १० डिसेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आले होते. सदर प्रसंगी विभागातील नागरिकांनी प्रचंड असा प्रतिसाद देऊन आरोग्य तपासणी व रक्तदान मोहिमेत सहभाग नोंदवला.

विशेष आभार

सौ कविता कृष्णा होवाळ – संकल्पना
श्री कृष्णा होवाळ – तुळशी रोपटे आणि बिस्किटे
श्री उदय राणे, उपशाखाप्रमुख – ज्येष्ठ नागरिक मधुमेह चाचणी शुल्क
वैष्णव मेडिकल व चारिटेबल ट्रस्ट – सभागृह
सम्मा सामाजिक संस्था – कार्यालय
ओम साई केटरर्स व डेकोरेटर, श्रीमती मानसी धवन
आयोजक
न्यू म्हाडा कॉलनी समन्वय समिती व ज्येष्ठ नागरिक संघ..
सर्व पदाधिकारी व सभासद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed