• Sat. Sep 21st, 2024
बहिणीला सोडायला गेली; परतत असताना नियतीनं डाव साधला, आईची वाट बघणाऱ्या लेकरांचं मातृछत्र हरपलं

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातील जाणवली रतांबी व्हाळ येथे मुबंई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये कणकवली शहरातील महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चार चाकीने वाहनाने जोरदार धडक दिल्याने या अपघातात दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. मृत महिलेचे नाव अंजली अमित साळवी (३७, रा. शिवाजीनगर कणकवली) असं आहे.
पैशासाठी भावानं तोडलं नातं; बहिणीचे दागिने देण्यास नकार, पोलिसांच्या मदतीने महिलेला मिळालं हक्काचं सोनं
मिळालेल्या माहितीनुसार, महिला कणकवलीहून जाणवली येथे स्कुटीवरून बहिणीला सोडायला आली होती. माघारी परतत असताना मागून येणाऱ्या कारने तिच्या स्कुटीला धडक दिली. त्यात ती गंभीर जखमी झाली. या अपघातामध्ये जखमी झालेल्या खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. आज गुरुवारी सायंकाळी आपल्या बहिणीला जाणवली रतांबी व्हाळ येथे घरी सोडून अंजली साळवी या मिडल कट जवळून कणकवलीच्या दिशेने येत असताना कारने जोरदार धडक दिली. त्यानंतर कार चालकाने कारसह पलायन केले. जखमी अवस्थेत अंजली साळवी याना कणकवली येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला.

मयत अंजली यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत. या धडक देऊन पळालेल्या कारच्या समोरील भागाचे नुकसान झाले असून कारचा काही भाग महामार्गावर मोडून पडला होता. कार आणि कारचालकाचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अंजली साळवी यांना जवळजवळ वीस ते तीस फूट फरपटत घेऊन कारचालक कारसह पसार झाला. या जखमी अंजली साळवी यांना त्यांचे भावोजी ॲड. संतोष दळवी यांनी कारमधून कणकवली येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता.

जगावं की मरावं; कापूस व केळी पीक शेतकऱ्याने दुष्काळी पथकासमोर व्यथा मांडली

या अपघाताचे वृत्त समजतात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील, पोलीस रुपेश गुरव, स्वप्निल जाधव, भूषण सुतार आदी घटनास्थळी दाखल झाले. अपघाताबाबत माहिती समजताच रुग्णालयात ॲड. भालचंद्र पाटील, माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, चेतन मुंज, चेतन अंधारी, बाळा पाटील, सिद्धेश बांदेकर, संकेत बांदेकर आदींनी धाव घेतली होती. त्यानंतर पंचनामा करून अंजली साळवी हिचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालय शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला. घटनेच्या वृत्त समजतात कणकवली येथील रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.अंजली साळवी यांच्या पश्चात पती, दोन मुले, सासू, भाऊ ,बहीण, आई असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed