• Mon. Nov 25th, 2024
    ठाणेकरांनो काटकसरीने पाणी वापरा; गुरुवारी पाणीबाणी, जाणून घ्या कोणकोणत्या भागात पाणी येणार नाही?

    ठाणे : ठाण्यातील सिद्धेश्वर जलकुंभाच्या जलवाहिनीच्या तांत्रिक कामासाठी गुरुवार, १४ डिसेंबर रोजी १२ तासांसाठी शहरातील काही भागांचा पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. या काळात नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे असे आवाहन ठाणे पालिका प्रशासनाने केलं आहे.

    ठाणे पालिकेच्या उथळसर प्रभाग समितीअंतर्गत येणाऱ्या सिद्धेश्वर जलकुंभाची इनलेट जलवाहिनीच्या ५०० मिमी व्यासाचा व्हॉल्व्ह बदलणे आवश्यक आहे. येत्या १४ डिसेंबर रोजी हे काम हाती घेतले जाणार असून सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत एकूण १२ तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. या शटडाऊन कालावधीत सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, समतानगर, दोस्ती, म्हाडा, विवियाना मॉल व आकृती आदी जलकुंभाच्या अंतर्गत येणाऱ्या परिसराचा पाणी पुरवठा १२ तासांसाठी पूर्णपणे बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, याबाबत नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

    मोठी बातमी: तुळजाभवानीचा गायब झालेला सोन्याचा मुकूट सापडला, मंदिरातच पितळी पेटीत…
    हजारो कुटुंबांना फटका

    सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, समतानगर, दोस्ती, म्हाडा, विवियाना मॉल व आकृती आदी जलकुंभाच्या अंतर्गत शहरातील मोठ्या परिसराचा समावेश होतो. या भागात मोठमोठी गृहसंकुले, म्हाडा सोसायटी आणि चाळी असल्याने हजारो कुटुंबांना या पाणीबाणीचा फटका बसेल. तर या काळात पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने सोसायट्या आणि गृहसंकुलांना टँकरच्या पाण्याचा वापर करावा लागण्याची शक्यता आहे.

    अजितदादांना मुख्यमंत्री करा, माझ्या पक्षाच्या पाठिंब्याची हमी मी देतो : भास्कर जाधव

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed