• Sun. Sep 22nd, 2024
पाण्यातून २९ जणांना विषबाधा; महिलांसह बालकांचा समावेश, एकाची प्रकृती अत्यवस्थ

जळगाव: जिल्ह्यातील शिवरे (ता.पारोळा) गावात आज शेतातील अशुद्ध पाणी पिल्याने आज शनिवारी (दि.९) दुपारी २९ मजूरांना विषबाधा झाली. सर्व रुग्णांवर पारोळा कॉटेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान यातील एका रुग्णांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला धुळे वैद्यकीय महाविद्यायल रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
निवडणुकीसाठी पक्ष मजबूत असणं आवश्यक, अमित ठाकरेंचे वक्तव्य; काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना भरला सज्जड दम
शिवरे गावात मध्यप्रदेशातून शेतमजूरीसाठी आलेले मजूर आणि त्यांच्या परिवारातील बालक अशा २९ जणांनी शेतातील एका ड्रममधील पाणी प्यायल्यानंतर त्यांना अचानक त्रास सुरु झाला. या ड्रममधील अनेक दिवसांपासून साचलेले पाणी प्यायल्याने विषबाधा झाली असावी, असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. २९ जणांपैकी २ जणांवर तामसवाडी आरोग्य केंद्रावर उपचार चालू आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखत गटविकास अधिकारी किशोर शिंदे घटनास्थळी पोहचत परिस्थितीचा आढावा घेतला. तालुका आरोग्य अधिकारीसह गटविकास अधिकारी कॉटेज हॉस्पिटल येथे उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

कुणाला वेड्यात काढताय, आम्ही डोक्याला गोडं तेल लावतोय काय ? सुषमा अंधारेंनी फडणवीसांना घेरलं

गावातील पाणी नमुने आरोग्य सेवकांनी घेतले आहेत‌. आमदार चिमणराव पाटील यांनीही रुग्णालयात रुग्णांची भेट घेत विचारपूस केली आहे. दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत घटनेची इत्यंभूत माहिती जाणून घेतली. रुग्णांवर तात्काळ मोफत उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed