• Fri. Nov 15th, 2024

    मराठी भाषा विद्यापीठासाठी भूमी अधिग्रहणास वेग द्यावा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

    ByMH LIVE NEWS

    Dec 7, 2023
    मराठी भाषा विद्यापीठासाठी भूमी अधिग्रहणास वेग द्यावा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

    नागपूर, दि. ७ : अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे उभारण्यात येणार्‍या मराठी भाषा विद्यापीठासाठी भूमी अधिग्रहणाच्या कार्यवाहीला वेग द्यावा, असे निर्देश  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी येथे आज येथे दिले.

    उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था (मॉरिस कॉलेज) येथे आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, विभागीय उपायुक्त गजेंद्र बावणे, रिद्धपूर येथील महंत कारंजेकर बाबा, महंत वाईनदेशकर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर, सहसचिव प्रताप कुंबाळ, संचालक शैलेंद्र देवळाणकर, सहसंचालक प्रकाश बच्छाव,  डॉ. उमेश काकडे, संतोष चव्हाण, प्रशासन अधिकारी डॉ. प्रभू दवणे तसेच आदी यावेळी उपस्थित होते.

    मराठी भाषा विद्यापीठ सुरू व्हावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होती. तिचे महत्त्व लक्षात घेऊन शासनाने समिती गठित केली. त्या समितीने अहवाल सादर केला आहे. मराठी भाषा विद्यापीठात विविध ज्ञानशाखा, शिक्षणक्रम आणि अभ्यासक्रम राबविताना विद्यार्थी रोजगारक्षम कसे होतील याचाही विचार करण्यात आला आहे. या अनुषंगाने विद्यापीठाच्या जागा उपलब्धतेबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी संबंधितांशी चर्चा केली. यावेळी जमीन अधिग्रहणाबाबत श्री. कटियार यांनी पर्याय सुचविले. त्यापैकी ई – क्लास जागा तसेच वनविभागाची जागा अनुकूल नसल्याबाबत कळविण्यात आले. त्यामुळे मराठी भाषा विद्यापीठासाठी जागा अधिग्रहण करण्याबाबत नियम व अटी तपासून उपविभागीय अधिकारी यांनी अहवाल सादर करण्याचे निर्देश श्री. पाटील यांनी यावेळी दिले .

    उपलब्ध जागा ज्या विभागाची आहे त्या विभागाकडून ना हरकत मिळवण्याची प्रक्रिया करण्यात यावी. तसेच  जागा अधिग्रहणाबाबत शेतकऱ्यांना अवगत करावे. भूमी अधिग्रहणाची कार्यवाहीला वेग द्यावा. मराठी भाषा विद्यापीठासाठी जागा मिळविण्यासाठी शोध घेऊन अहवाल सादर करावा . जागा अधिग्रहित करून जून  २०२४ पासून विद्यापीठ सुरु करण्यात येईल, असे श्री. पाटील यावेळी म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed