• Sat. Mar 7th, 2026

    बेपत्ता ८ वर्षीय लेक सापडलीच नाही, अखेर शेजारच्या बंद खोलीचा दरवाजा उघडताच कुटुंब हादरलं

    बेपत्ता ८ वर्षीय लेक सापडलीच नाही, अखेर शेजारच्या बंद खोलीचा दरवाजा उघडताच कुटुंब हादरलं

    वसई : बेपत्ता असलेल्या ८ वर्षीय मुलीचा सगळीकडे शोध घेतला पण कुठेही पत्ता लागला नाही. १ डिसेंबर रोजी शाळेतून घरी आल्यानंतर ती स्वतःसाठी आईस्कीम आणण्यासाठी गेली होती तेथून परतल्यानंतर घराजळच खेळत असताना संध्यकाळी अचानक बेपत्ता झाली. तिला सगळ्यांनी सर्वत्र शोधलं. पण तिचा काही पत्ता लागला नाही. पण यानंतर असं काही घडलं की सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. या घटनेने परीसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पेल्हार पोलीस अधिक तपास करीत आहेत.

    वसई पूर्वेला असलेल्या वसई फाटा परिसरात आठ वर्षाची अल्पवयीन मुलगी आपल्या आई वडील आणि भावंडासह रहात होती. जवळच्याच जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता तिसरीत शिकत होती. शनिवार १ डिसेंबर रोजी शाळेतून घरी आल्यानंतर ती स्वतःसाठी आईस्कीम आणण्यासाठी गेली होती तेथून परतल्यानंतर घराजळच खेळत असताना संध्यकाळी अचानक बेपत्ता झाली. तिच्या कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती सापडल्याने पेल्हार पोलीस ठाणे गटात याबाबत तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

    सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारासच्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह ती राहत असलेल्या घराच्या शेजारी असलेल्या बंद खोलीत एका गोणीत आढळून आला आहे. पेल्हार पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेवून मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर तिचा मृत्यू नेमका कसा झाला? तिच्यावर अत्याचार झाला होता का ? हे स्पष्ट होईल. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांची तीन स्थापन करण्यात आली आहेत. या प्रकरणचा तपास करून लवकरात लवकर आरोपीला अटक करण्यात येईल असे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी सांगतले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed