• Mon. Mar 9th, 2026

    आयुष्यभर सुखाचा संसार, पण आजारपणाने हरवलं; ७० वर्षीय पतीने पत्नीला संपवून घेतला जगाचा निरोप

    आयुष्यभर सुखाचा संसार, पण आजारपणाने हरवलं; ७० वर्षीय पतीने पत्नीला संपवून घेतला जगाचा निरोप

    नागपूर : आजारग्रस्त वृद्धाने अंथरुणाला खिळलेल्या पत्नीची हत्या करून स्वत: आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना मौदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माथनी येथे घडली.

    काय घडलं?

    प्रभाकर रामाजी गजभिये (वय ७५) व त्यांच्या पत्नी विमला गजभिये (वय ७०) अशी मृतकांची नावे आहेत. प्रभाकर यांना दम्याचा आजार होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमला या गेल्या तीन महिन्यांपासून आजारी होत्या. अंथरुणावरच त्यांची शुश्रूषा व्हायची. त्यांची देखभाल प्रभाकर करायचे. पत्नीही आजारी असल्याने प्रभाकर कंटाळले. रविवारी सायंकाळी त्यांनी दुपट्ट्याने गळा आवळून विमला यांची हत्या केली. त्यानंतर दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

    घरात सापडली चिठ्ठी…

    आत्महत्येपूर्वी प्रभाकर यांनी चिठ्ठी लिहिली. ‘मी व पत्नी सतत आजारी राहतो. या आजाराला मी कंटाळलो असून पत्नीची हत्या करून आत्महत्या करीत आहे’, असे चिठ्ठीत लिहिले आहे. त्याआधारे मौदा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. गेल्या वर्षी दोघेही माथनी येथील मुलीकडे राहायला आले होते. त्यांचा मुलगा छत्तीसगडमध्ये नोकरी करतो.

    महाराष्ट्र हादरला! मुलाला अखेरची चिठ्ठी लिहून ८९ वर्षीय वृद्धाने संपवले जीवन, खळबळजनक कारण समोर

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed