• Mon. Nov 25th, 2024
    अवकाळीने एका रात्रीत द्राक्षबाग भुईसपाट… शेतकऱ्याने चंद्रकांत पाटलांसमोर हंबरडा फोडला

    सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्याला २८ नोव्हेंबर रोजी अवकाळी पावसाचा तडाखा बसला होता. सोलापूर जिल्ह्यातील जवळपास २९ हजार हेक्टर शेती पिकांचं नुकसान झालं आहे.नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून महसूल प्रशासन पंचनामे करत आहेत. सोमवारी ४ डिसेंबर रोजी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त फटका दक्षिण सोलापूर तालुक्याला बसला असल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दक्षिण सोलापूर येथील कासेगावात शेती पिकांची पाहणी केली. कासेगाव येथील शेतकरी अजित मिटकरी यांच्या द्राक्षाच्या बागेला अवकाळीचा मोठा फटका बसल्याने त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच हंबरडा फोडला.

    एका रात्रीत बाग भुईसपाट….

    दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील अजित मिटकरी व विक्रम मिटकरी या दोन भावंडाची साडेचार एकर शेती आहे. शेतात त्यांनी साडेतीन लाख रुपये खर्च करून द्राक्ष बाग लागवड केली. द्राक्षांच्या मोसमात पंधरा ते सोळा लाख रुपये उत्पन्न होईल, अशी अपेक्षा मिटकरी कुटुंबाला होती. मात्र २८ नोव्हेंबर रोजी रात्री सुरू झालेल्या अवकाळी पावसाचा कासेगावला जबरदस्त तडाखा बसला. साडेचार एकरावरील द्राक्षाची सर्वच बाग भुईसपाट झाली. प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी दुसऱ्या दिवशी पाहणी करून पंचनामा केला आहे.

    सोलापूरचं मिलेट सेंटर बारामतीला, भाजप आमदार देशमुखांचा राजीनाम्यावरून युटर्न, दादा म्हणतात, ते खरं मानायचं नसतं!
    शेतकऱ्याला अश्रू अनावर, चंद्रकांत पाटील यांच्याकडून पाठीवर थाप मारत धीर

    सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवारी सायंकाळी मिटकरी यांच्या कासेगाव येथील द्राक्ष बागेला भेट दिली. उद्धवस्त झालेल्या द्राक्षाच्या बागेला पाहून अजित मिटकरी या शेतकऱ्यास चंद्रकांत पाटील व इतर अधिकाऱ्यांसमोर अश्रू अनावर झाले. रडत रडत चंद्रकांत पाटील यांचे पाय धरले आणि बाग उद्धवस्त झाल्याची खंत व्यक्त करताना शासनाच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजित मिटकरी यांचं सांत्वन करत पाठीवर थाप मारत त्यांना धीर दिला.

    भरपाई देणार असाल तर सांगा, नाहीतर रामराम! बांधावर गेलेल्या पालकमंत्री भुसेंना शेतकऱ्यांचे खडेबोल

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed