-या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एसीसह अद्ययावत सुविधा असलेल्या दोन खोल्या मॉडेल म्हणून तयार केल्या. इतर खोल्यांमध्येही अशी सुविधा निर्माण करावी, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
-अधिवेशनासाठी आमदार निवास सज्ज होत आहे. रंगरंगोटीसह इतर कामे अंतिम टप्प्यात आली असून ५ डिसेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण होतील, असा विश्वास ‘पीडब्ल्यूडी’कडून व्यक्त करण्यात आला.
-आमदार निवास येथे तीन विंग आहेत. आमदारांना राहण्यासाठी विंग १मध्ये १३२, विंग २मध्ये १८३ आणि विंग ३मध्ये ७१ खोल्या आहेत. विंग ४मध्ये १६ सभागृह तयार करण्यात आले आहेत.
-येथे विधानभवनात येणाऱ्या विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था केली जाते. आमदार निवासाची रंगरंगोटी नियमित केली जात असली तरी अनेक आमदार इथे राहायला इच्छुक नसतात. सर्व सुविधांनी अद्ययावत खोल्या तयार करण्यात याव्यात, अशी मागणी आमदारांकडून करण्यात येत आहे.
येणार २५ कोटींचा खर्च
विंग २मध्ये पीडब्ल्यूडीकडून तयार करण्यात आलेल्या दोन अद्ययावत खोल्यांमध्ये एसीसह इंटरनेटचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तळमजल्यावर एक आणि पहिल्या मजल्यावर एक खोली तयार करण्यात आली. गरज पडली तर बेड तयार होईल, असा सोफा इथे ठेवण्यात आला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या खोल्यांची अलीकडेच पाहणी केली. मंजुरी मिळाल्यानंतर अशाच पद्धतीने इतर खोल्यांचेही नूतनीकरण करण्यात येईल, यासाठी सुमारे २५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, असे पीडब्ल्यूडीकडून सांगण्यात आले.
इतर तयारीही जोरात
-आमदार निवासातील विंग २ आणि विंग ३ येथील रिसेप्शन काउंटर तयार करण्यात येत आहे.
-आमदारांना फेरफटका मारण्यासाठी आणि मोकळी हवा घेण्यासाठी बगिचाही सुशोभित करण्यात आला.
-गैरसोय होऊ नये, यासाठी इतर दुरुस्तीची कामेही करण्यात आली.
-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी ३१/ए विजयगड बंगला तयार करण्यात आला. वास्तुशास्त्राप्रमाणे या बंगल्याची रचना ठेवण्यात आली आहे.
-या बंगल्याचे हेरिटेज रूप कायम राहावे, यावर विशेष भर देण्यात आला आहे. नूतनीकरणासाठी १ कोटी ८ लाख रुपये खर्च करण्यात आले.
-असामाजिक तत्त्वांकडून गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी सुरक्षेच्या उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. बॅरिकेड्स आणि ग्रील लावण्यात आल्या आहेत.
Read Latest Maharashtra News And Marathi News