• Sat. Sep 21st, 2024
एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह विधान; दत्ता दळवी यांना जामीन, मुलुंड न्यायदंडाधिकारी न्यायालयाचा निर्णय

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करून दोन गटांत तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला, या आरोपाखाली बुधवारी अटक कारवाई झालेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते दत्ता दळवी यांना शुक्रवारी मुलुंड न्यायदंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला.
फी अपूर्ण; विद्यार्थी परीक्षेपासून वंचित, बीएससीच्या ६ विद्यार्थ्यांची कॉलेजकडून अडवणूक
भांडुपमध्ये सोमवारी ठाकरे पक्षाच्या कोकणवासीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी दळवी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप आहे. याबाबतची चित्रफीत पसरल्यानंतर एका कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून भांडुप पोलिसांनी मंगळवारी एफआयआर नोंदवत बुधवारी सकाळी दळवी यांना त्यांच्या घरातून अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

शरद पवारांचं राजकारण संपवण्याची सुपारी अजितदादांकडे? अनिल देशमुखांच्या आरोपावर हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया

मात्र, आपण कोणताही गुन्हा केलेला नाही, असे म्हणून दळवी यांनी अॅड. संदीप सिंह यांच्यामार्फत जामीन अर्ज केला होता. ‘दळवी यांना खोट्या गुन्ह्याच्या प्रकरणात गोवण्यात आले आहे. शिवाय या कथित गुन्ह्याचा पोलीस तपास पूर्ण झाला असल्याने दळवी यांना गजाआड ठेवण्यात काहीच अर्थ नाही’, अशा प्रकारचा युक्तिवाद सिंह यांनी केला होता. न्यायाधीश एम. आर. वाशिमकर यांनी दोन्ही बाजू तपासल्यानंतर दळवी यांना शुक्रवारी जामीन मंजूर केला. जामिनाबाबतच्या सविस्तर आदेशाची प्रत नंतर उपलब्ध होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed