• Mon. Nov 25th, 2024
    मराठी पाट्यांर्भात संदर्भात मनसे आक्रमक, बालगंधर्व चौकात थेट दुकानांची तोडफोड

    पुणे : मराठी पाट्यांच्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून राज्यभर आंदोलन केलं जातं आहे. पुण्यात देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज बालगंधर्व चौकात इंग्रजी पाट्या लावण्यात आलेल्या दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे.

    मराठी पाट्या लावण्याची २५ नोव्हेंबर ही अंतिम मुदत होती. सर्व शहरातील अनेक दुकाने, संस्था, आस्थापनामध्ये मराठी भाषेत पाट्या लावणे व व्यवहार करणे हे दुकान व संस्था अधिनियम १९४८ अन्व्ये बंधनकारक आहे, असे असतांना देखील पुण्यात तसेच राज्यभर दुकानदारांकडून इंग्रजीमध्ये पाट्या लावण्यात आल्या आहेत. म्हणून आज आम्ही हे आंदोलन करत असल्याचं यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.

    यावेळी मनसेचे नेते साईनाथ बाबर म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने आदेश देऊनदेखील मराठीमध्ये पाट्या लावण्यात आलेल्या नाही. आज आम्ही फक्त जे ब्रँड आहे, त्या दुकानांची तोडफोड करत आहोत. आमचं इशारा आहे की, सर्वांनी मराठीमध्ये पाट्या लावावे अन्यथा आम्ही मनसे स्टाईलने पुन्हा एकदा खळकट्याक करू असा इशारा दिला आहे.

    यावेळी मनसे नेते बाबू वागस्कर म्हणाले की, आम्ही सातत्याने मराठी पाट्यांच्यासाठी प्रयत्न करत आहोत. महापालिकेला आम्ही पत्रव्यवहार केलं की, महापालिका हद्दीत जेवढे काही दुकानदार आहे. त्यांना नियमानुसार, मराठी पाट्या लावण्याचे आदेश देण्यात यावे. पण असं काहीही होत नाही. आज आम्ही जे टार्गेट केलं आहे, ते बहुराष्ट्रीय कंपन्या आहे. हे कंपनीधारक जर ठरवून मराठी पाट्या लावत नसेल तर आमच्यासारखं महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरणार आणि म्हणून आज आम्ही हे आंदोलन केलं असल्याचं यावेळी शिंदे यांनी सांगितलं.

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मराठी पाट्याच्या संदर्भात करण्यात आलेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, तसेच मनसे नेते बाबू वागस्करसह ७ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावर डीसीपी संदीप गिल म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आज जे आंदोलन करण्यात आलं. त्याची कोणतीही कल्पना पोलिसांना देण्यात आलेली नव्हती. अचानक मनसेचे कार्यकर्ते हे संभाजी उद्यानात आले आणि त्यांनी दुकानांची तोडफोड केली. कायदा हातात घेऊन त्यांनी अशा पद्धतीची तोडफोड केली आहे, याची अधिक तपासणी करत आहोत. ज्या ज्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली आहे त्या त्या ठिकाणचे सीसीटिव्ही तपासण्यात येणार आहे आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं यावेळी गिल म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed