• Sat. Sep 21st, 2024

शिक्षकाने पत्नी आणि ५ वर्षांच्या चिमुकल्याची हत्या करुन आयुष्य संपवलं, सोलापूर हादरलं

शिक्षकाने पत्नी आणि ५ वर्षांच्या चिमुकल्याची हत्या करुन आयुष्य संपवलं, सोलापूर हादरलं

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमधील उपळाई रोडवरील नाईकवाडी प्लॉट येथे शिक्षक पतीने आपल्या शिक्षिका पत्नीचा गळा कापून आणि आपल्या पाच वर्षांच्या मुलाच्या तोंडावर उशी ठेवून हत्या केली आहे. त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्याने बार्शी शहरात मोठी खळबळ उडाली आहे. बार्शी शहर पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हत्याकांडाने बार्शी शहर हादरले

अतुल सुमंत मुंढे (वय ४०), तृप्ती अतुल मुंढे (वय ३५) ओम सुमंत मुंढे (वय ५) असे त्या मयत तिघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहिती नुसार, अतुल मुंढे हे करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. तर तृप्ती मुंढे या बार्शीतील अभिनव प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. दोघेही उपळाई रोडवरील आपल्या घरात वरच्या मजल्यावर राहत होते.

चालकाला रुग्णवाहिकेतून खाली खेचलं, बांबूने मारलं, मग चाकूने… डी. वाय. पाटील रुग्णालयासमोरील धक्कादायक घटना
मंगळवारी सकाळी घरातून कोणीही बाहेर न आल्याने अतुल मुंढे यांच्या आई-वडिलांनी घराचा दरवाजा ठोठावला. आतून काहीही प्रतिसाद न आल्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता तृप्ती या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करताच मुलगा अतुल, नातू आणि सून तिघांचे मृतदेह होते. हे दृश्य पाहून आई-वडिलांना जबर धक्का बसला.

तात्काळ पोलिसांनी कळविले

अतुल मुंढे यांचे आई-वडील खालच्या मजल्यावर राहतात. वरच्या मजल्यावरील कोणीही खाली न आल्याने अतुल यांच्या आई-वडिलांनी मंगळवारी सकाळीवर जाऊन पाहिलं असता ही घटना उघडकीस आली. त्यानंतर तात्काळ बार्शी पोलिसांना कळविण्यात आले. पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले असून अधिकचा तपास सुरू आहे. या घटनेने बार्शी शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी उपळाई रोडवरील नाईकवाडी प्लॉट येथे मोठी गर्दी झाली आहे.

एक चूक अन् चक्क ३ कोटींची लॉटरी लागली, या व्यक्तीसोबत जे घडलं ते पाहून सारे थक्क
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed