याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश पांडुरंग शिंदे आणि एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २ नोव्हेंबर रोजी घडली आहे. या प्रकरणी संबधित महिलेने तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी यांच्या मुलाचे त्यांच्या लहान भावाच्या मुलीसोबत लग्न झाले आहे. त्यांना दोन लहान मुलेदेखील आहेत. फिर्यादी यांची सून तिच्या मुलांना घेऊन तिच्या वडिलांकडे राहते. त्यामुळे नातवंडांच्या भेटीच्या ओढीने फिर्यादी या आपल्या भावाच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी जर तुला नातवंडांना घरी न्यायचे असेल तर तुला दीड कोटी रुपये द्यावे लागतील असे म्हणत खंडणी मागितली. जर दीड कोटी रुपये नाही दिले तर मुंबईच्या धारावी झोपडपट्टीतील मुलांना आणून तुला मारुन टाकतो अशी धमकी देखील दिली. तसेच शिवीगाळ करून मारहाण देखील केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास तळेगाव दाभाडे पोलिस करत आहेत. मात्र, या प्रकारामुळे पंचक्रोशीत चर्चा सुरू झाली आहे. नातवंडांना भेटण्यासाठी दीड कोटी रुपये द्यायचे का? अशी चर्चा देखील आता सुरू झाली आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News