• Mon. Nov 25th, 2024

    रात्रीच्या अंधारात शेतात पाणी देण्यासाठी गेले, परतताना शेतकऱ्यावर काळाचा घाला, कुटुंबीयांचा आक्रोश

    रात्रीच्या अंधारात शेतात पाणी देण्यासाठी गेले, परतताना शेतकऱ्यावर काळाचा घाला, कुटुंबीयांचा आक्रोश

    जळगाव: घरी दिवाळी साजरी करण्यासाठी मुलं-मुली, पाहुणे आलेले असातानाच एक शेतकऱ्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. शेतातील पिकांना पाणी देवून परत येतो म्हणून शेतकरी शेतात गेला, मात्र शेतातून परततांना रस्त्यात दुचाकीचा अपघात झाला. अपघातात शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना एरंडोल येवला राज्य मार्गावर भडगाव तालुक्यातील गुढे कोळगाव दरम्यान घडली. भरत काशिनाथ माळी (वय ५२ रा, गुढे ता भडगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकऱ्यावर दिवाळी सणासुदीच्या काळात काळाने घातल्याने त्यांच्या घरी दिवाळी साजरी करण्यासाठी मुलं-मुली, पाहुणे या सर्व कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    गुढे येथे शेतकरी आणि भाजीपाला व्यावसायिक भरत काशिनाथ माळी हे कुटुंबासह वास्तव्यास होते. शेतीवर ते उदरनिर्वाह करत होते. दिवसा वीज पुरवठा नसल्याने रात्रीच्या वेळी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जावं लागतं. त्यानुसार रविवारी दहा ते सकाळी सहा या दरम्यान वीज पुरवठा सुरू असल्याने भरत माळी हे पिकांना पाणी देण्यासाठी दुचाकीने शेतात गेले.

    क्रूरपणा येतो कुठून? पोरांनी कोंबडीच्या गुप्तांगात फटाका लावला; मुक्या जीवाचा वेदनादायी अंत
    रात्रीची वेळ असल्याने व घरी दिवाळीसाठी मुली व पाहुणे आलेले असल्याने कुटुंबियांनी त्यांना शेतात जाण्यास नकार दिला होता. मात्र, पिकांची चिंता असल्याने भरत माळी यांनी ऐकले नाही. पिकांना पाणी देण्यासाठी ते शेतात निघून गेले. पिकांना पाणी देऊन परत येत असताना गुढे गावाजवळच विश्वास नगर येथे त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही. त्यांना उपचारासाठी चाळीसगाव येथे घेऊन गेले असता चाळीसगाव येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

    रस्त्यात उभ्या वाहनामुळे अपघात झाल्याची गावात चर्चा

    रस्त्याच्या दुतर्फा ट्रक, ट्रॅक्टर,गाडी बैल, रस्त्यावर लावल्यामुळे या ठिकाणी नेहमी अपघात होण्याची भिती काही दिवसांपूर्वी गावातील ग्रामस्थांनी व्यक्त केली होती. अशाचप्रकारे रस्त्यात उभ्या वाहनाला दुचाकी धडकून अपघात झाल्याची अपघात झाल्याची गावात चर्चा आहे. मयत भरत माळी यांच्यावर सोमवारी दुपारी बारा वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता. भरत माळी त्यांच्या पश्चात पत्नी , निवृत्ती व सोपान अशी दोन मुले , मुली असा परिवार आहे. ऐन दिवाळीत मृत्यू झाल्याने माळी कुटुंबिय सुन्न झाले असून गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

    जळगावचे वीर जवान विनोद पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, शोकाकूल वातावरणात साश्रू नयनांनी निरोप

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *