याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात चालक गोविंद भालचंद्र लाल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. रविवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला असून त्याचे सीसीटिव्ही आता समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे – कोलाड महामार्गावर मुळशी तालुक्यातील पिरांगुट घाट उतारावर सिमेंटच्या विटा घेऊन जाणाऱ्या टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तो टेम्पो वेगात येऊन त्याने रस्त्यावरील पाच दुचाकी आणि एक चार चाकी वाहनांना धडक दिली. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली होती. टेम्पोचा वेग इतका होता की, रत्स्यवरून जाणाऱ्या नागरिकांना पाळायला देखील संधी मिळाली नाही.
या अपघातात सात नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान देखील झाले आहे. जखमींमध्ये एका डॉक्टरचा समावेश असून गंभीर अवस्थेत त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवले आहे. उर्वरित सहा जखमींना पिरंगुट तसेच लवळे फाटा येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून टेम्पो अत्यंत वेगात येऊन त्याने एकामागे एक वाहनांना धडक देत नुकसान केले आहे. याप्रकरणी चालकावर पौड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.