• Tue. Jun 16th, 2026

    Pune Crime: पुण्यातील त्या मृतदेहाचे गूढ उलगडले; पत्नीविषयी अपशब्द वापरल्याने तरुणाला संपवलं, नेमकं काय घडलं?

    Pune Crime: पुण्यातील त्या मृतदेहाचे गूढ उलगडले; पत्नीविषयी अपशब्द वापरल्याने तरुणाला संपवलं, नेमकं काय घडलं?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याने डोक्यावर वार करून तरुणाचा खून करण्यात आला. नऱ्हे येथील स्वामीनारायण मंदिराजवळील मोकळ्या जागेत ही घटना घडली. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

    काय घडलं?

    सौरभ रुपेश शिंदे (वय २३, रा. आंबेगाव पठार, कात्रज) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याचे वडील रुपेश शिंदे (वय ४९) यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अनिकेत परदेशी (वय २८, रा. अभिनव कॉलेज रस्ता, नंदनवन सिटी, नऱ्हे) याला अटक करण्यात आली आहे. स्वामीनारायण मंदिराच्या परिसरातील मोकळ्या जागेत तरुणाचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली असता, तो सौरभचा असल्याचे समोर आले. त्याच्या डोक्यामध्ये दगड घालण्यात आला होता. खुनामागील कारण समजू शकले नव्हते. त्यानंतर पोलिसांनी माग काढून आरोपीला ताब्यात घेतले.
    थेट पोलिसावरच चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल; अल्पवयीन मित्रामुळे प्रकार उघडकीस, नेमकं काय घडलं?
    सहायक पोलिस निरीक्षक राहुल यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ आणि अनिकेत यांची नवले पुलाजवळ ओळख झाली होती. दोघे दारू प्यायले होते. त्यांच्यात पत्नीवरून संवाद झाला. सौरभने अनिकेतच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याने चिडलेल्या अनिकेतने सौरभच्या कपाळावर, तोंडावर आणि डोक्यावर वार करून त्याचा खून केला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed