• Sat. Sep 21st, 2024

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर २१ नोव्हेंबरला ब्लॉक; २ तास वाहतूक पूर्णत: बंद राहणार, जाणून घ्या सविस्तर…

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर २१ नोव्हेंबरला ब्लॉक; २ तास वाहतूक पूर्णत: बंद राहणार, जाणून घ्या सविस्तर…

पुणे: यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर कि.मी ३५/५०० येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू आहे. त्यामुळे दि. २१ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत या लांबीत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे.
वैतरणा नदीवर पुलाचे बांधकाम, परतताना कामगारांसोबत अनर्थ, बोट बुडाल्याने मोठी दुर्घटना, दोघे बेपत्ता
या कालावधीत मुंबईहून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने द्रुतगती मार्गाच्या कि.मी ०८/२०० येथील शेडूंग फाटा येथून वळवून रा.म.मा. क्र. ४८ जुना मुंबई पुणे महामार्गावरील शिंग्रोबा घाटातून द्रुतगती मार्गाच्या मॅजिक पॉइंट कि.मी. ४२/१०० येथून पुन्हा द्रुतगती मार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येणार आहे. तसेच गॅन्ट्री बसविण्याचे काम पूर्ण झाल्यावर दुपारी २ वाजता द्रुतगती मार्गावरील मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आली आहे.

टाळ, तुणतुणं आणि संबळ हाती घेत भाजप आमदार संजय कुटे झाले गोंधळी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर विविध ठिकाणी ग्रँटी बसविण्यात येत आहे. त्यामुळे अनेकदा विशेष ब्लॉक घेतले जात आहे. उद्या देखील दोन तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे दुपारी १२ ते २ या वेळेत महामार्गावरून प्रवास करणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा दोन मेट्रो सिटीना जोडणारा महत्वाचा मार्ग आहे. त्यामुळे या महामार्गवरून दररोज लाखोंच्या संख्येने प्रवाशी नागरिक ये-जा करत असतात. मात्र उद्या दोन तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे याची प्रवाशी नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed