• Sat. Sep 21st, 2024
डिलाईल ब्रिजचे परस्पर ‘उद्घाटन’ महागात, आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटाच्या नेत्यांवर गुन्हा

मुंबई : माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना मुंबईतील लोअर परेल भागात असलेल्या बहुप्रतीक्षित डिलाईल ब्रिजचे परस्पर ‘उद्घाटन’ महागात पडले आहे. आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सुनिल शिंदे, सचिन अहिर आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१६ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी विधानपरिषद आमदार सुनील शिंदे, विधानपरिषद आमदार सचिन अहिर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी महापौर स्नेहल आंबेकर यांच्यासह १५ ते २० अनोळखी कार्यकर्त्यांचा बेकायदेशीर जमाव जमवून महानगरपालिका आयुक्त (बृहन्मुंबई) यांच्या पूर्वपरवानगी शिवाय काम अपूर्ण असलेल्या डिलाईल पूलाचे उद्घाटन केल्याचा आरोप आहे.

वाट पाहीन एसटीनेच जाईन, दिवाळीत ST महामंडळ मालामाल, तब्बल ३२८ कोटींचा महसूल
लोअर परेल ब्रिजच्या सुरुवातीला एसीक भवन समोर लावलेले बॅरिगेट काढून, ब्रिजवर अतिक्रमण करून, आदित्य ठाकरे आपले सहकारी व कार्यकर्ते यांच्यासह ब्रिजच्या मध्यापर्यंत पायी चालत गेले. त्यांनी वाहतुकीस तयार नसलेला दक्षिण वाहिनी पूल हा वाहतुकीस अनधिकृतरित्या खुला केला. त्यामुळे ब्रिजवरून वाहतूक सुरू झाली. त्यावरून काही वाहनं गेली. संबंधित वाहन चालकांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती.

डिलाई रोडचं उद्घाटन बेकायदेशीर, महापालिकेकडून पहाटे चार वाजता आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल

Read Latest Mumbai Updates And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed