• Sat. Sep 21st, 2024

दारू प्यायल्यानंतर नेहमी चॉकलेट खायचे, ही सवयच जीवावर बेतली, जे खाल्लं ते काय होतं?

दारू प्यायल्यानंतर नेहमी चॉकलेट खायचे, ही सवयच जीवावर बेतली, जे खाल्लं ते काय होतं?

रत्नागिरी: दारू पिण्याचे व्यसन अनेकदा जीवावरती बेतते असाच एक धक्कादायक प्रकार चिपळूण शहरात कावळीतळी परिसरात घडला आहे. व्यसनाच्या आहारी गेलेली माणसे कधीकधी काय करतात ते त्यांचं त्यांनाच कळत नाही. याच दारूच्या व्यसनात चॉकलेट समजून थेट रेटॉल ट्यूब खाल्ल्याने एका ५८ वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मकसुद हाजम भाई (वय ५८ वर्ष रा.काविळतळी ता. चिपळुण) असे मृत्यू झालेला इसमाचे नाव आहे.

९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ज्युपीटर हॉस्पिटल, पुणे येथे उपचार सुरू असताना विषारी पदार्थ सेवन केलेल्या या इसमाचा मृत्यू झाला आहे.

कचरा समजून फेकणार होती, तो १३ व्या शतकातील खजिना निघाला, किंमत २०८ कोटी रुपये
मकसुद यांना दारूचे व्यसन होते. दारू प्याल्यानंतर त्यांना चॉकलेट खाण्याचीही सवय होती. मात्र, ही सवय त्यांच्या थेट जीवावरती बेतली आहे. चिपळूण शहरातील कावीळतळी परिसरात राहणारे मकसूद यांनी ५ नोव्हेंबर रोजी रात्री दारू पिल्यानंतर चॉकलेट खाण्याची सवय असल्याने रात्री त्यांनी चॉकलेट समजुन रेटॉल ट्यूब दारुच्या नशेत खाल्याने याचा त्रास त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी होऊ लागला. ६ नोव्हेंबर रोजी त्यांना अस्वस्थ होऊ लागल्याने व उलट्या होऊ लागल्याने त्यांना नातेवाईकांनी तात्काळ चिपळूण शहरातील एस. एम. एस. हॉस्पिटल येथे दाखल केले.

त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी ज्युपीटर हॉस्पिटल पुणे येथे हलविण्यात आले होते. येथे त्यांच्यावरती उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या सगळ्या प्रकरणाची नोंद चिपळूण शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास चिपळूण पोलिस करत आहेत.

जुन्या भांडणाचा राग, मित्रावर वार; डोक्यात दगड घालून संपवलं, नाशकात हत्येची हादरवणारी घटना
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed