• Mon. Nov 25th, 2024

    आमदारांना, मंत्र्यांना गावबंदी करता,महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिला काय? छगन भुजबळ

    आमदारांना, मंत्र्यांना गावबंदी करता,महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिला काय? छगन भुजबळ

    जालना : ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील धाईत नगर येथे पार पडली. यावेळी एल्गार सभेचे आयोजक छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. छगन भुजबळ यांनी आजच्या सभेत अंतरवाली सराटीमध्ये ज्या दिवशी लाठीचार्ज झाला तेव्हा काय घडलं ते सांगितलं.

    छगन भुजबळ यांनी भाषणाच्या सुरुवातीलाचं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांचं स्मरण केलं. जालना जिल्ह्यात ६ जून १९९३ ला महात्मा फुले समता परिषदेची सभा झाली. त्या सभेत ओबीसी आरक्षण मंडल आयोग लागू करुन देण्याची मागणी केली. याच जिल्ह्यात ती मागणी पूर्ण करण्याचं वचन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी दिलं. मंडल आयोग हा पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी स्वीकारला आणि ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मंडल यांचे सहकारी देशभर फिरले. आम्ही शरद पवार यांच्याकडे अंमलबजावणी केली. शरद पवार यांच्याकडे दुसऱ्या कुणाला आरक्षण देण्याचे अधिकार नव्हते, असं छगन भुजबळ म्हणाले.

    आज मराठा समाजाचे नवे देव निर्माण झालेत त्यांचं म्हणनं असं आहे की धनगर, माळी, तेली मध्येच घुसले आहेत पण तुम्ही समजून घ्या, त्यांना कळणार नाही त्यांच्या डोक्या पलीकडील गोष्ट आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३४० व्या कलमात सांगितलं होतं की ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिजे. १३ एप्रिल १९६८ ला ओबीसी समाजाला आरक्षण मिळालेलं आहे, असं छगन भुजबळ म्हणाले. मंडल आयोगानं आरक्षण दिलं त्यावेळी पण कोर्टात गेले होते. सुप्रीम कोर्टात ९ न्यायमूर्ती बसले होते, त्यात महाराष्ट्रातील थोर विचारवंत न्यायमूर्ती पी. बी. सावंत देखील त्यामध्ये होते. सुप्रीम कोर्टाच्या शिक्क्यानिशी मार्च १९९४ आरक्षणाचा जीआर निघाला. कुणाचं खाताय कुणाचं खाताय असं विचारता, अरे तुझं खातो कारे असा सवाल मनोज जरांगे यांना छगन भुजबळ यांनी केला.

    सुप्रीम कोर्टानं इंद्रा सहाणी प्रकरणानंतर आयोग करुन ओबीसींना आरक्षण द्यायचं असं सांगितलं होतं. १६ नोव्हेंबर १९९२ ला आरक्षण देण्याचे अधिकार केंद्र आणि राज्य सरकारकडून आयोगांकडे गेले होते. १९९२ नंतरच्या सगळ्या आयोगांनी देता येणार नाही हे सांगितलं हा आमचा दोष आहे का? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला. आम्हाला आरक्षण संविधानानं, सुप्रीम कोर्टानं, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आहे पण त्यांना काहीच माहिती नाही, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.

    छगन भुजबळ दोन वर्ष बेसन भाकर तुरुंगात खाऊन आलो असं सांगतात, होय आलो. छगन भुजबळ दिवाळीत सुद्धा बेसन भाकर आणि कांदा फोडून खातो, तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही, अशी टीका, छगन भुजबळ यांनी केली.
    वर्ल्डकप दुखापत हार्दिक पांड्यासाठी मोठा धक्का, क्रिकेट करियरला लागला मोठा ब्रेक; जाणून घ्या अपडेट्स
    छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना भेटायला गेलेल्या मंत्री आणि न्यायमूर्तींच्या शिष्ठमंडळावर देखील नाराजी व्यक्त केली आहे. जालन्यात लाठीचार्ज झाला तेव्हा प्रथम पोलिसांवर हल्ला झाला होता. मनोज जरांगे यांना राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी मध्यरात्री साडेतीन वाजता उठवून आणलं, असं भुजबळ म्हणाले.
    हे ११ हिरो भारताला १२ वर्षांनंतर जिंकवून देणार वर्ल्डकप, फायनलसाठी अशी असणार भारताची प्लेइंग इलेव्हन
    आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. ७५ वर्ष झाली, दलित समाजाला संविधानानं आरक्षण दिलं, कलेक्टर झाले, आयपीएस झाले पण गरिबी दूर झाली नाही. ओबीसींची गरिबी दूर झाली नाही. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. वर्षानुवर्षे जे दबलेले आहेत, पिचलेले आहेत त्यांना वर आणायसाठी आरक्षण आहे, ते तर समजून घे, असं छगन भुजबळ म्हणाले.

    दिवाळीत गजबजलेली ‘सुवर्णनगरी’ ओस, सोन्या-चांदीचे भाव वाढताच ग्राहकांची पाठ, काय आहे कारण?
    मराठा तरुणांना सांगायचं आहे , याच्या कुठं मागं लागलात, झाडाला शेंदूर फासून देव झाला, त्याला कळणा आणि वळणा, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर टीका केली.

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed