सोने खरेदीतील देशाच्या एकूण उलाढालित जळगावच्या सुवर्णनगरीचा ही मोठा वाटा असतो .गेले दोन ते तीन वर्ष करोनाचा काळ होता त्यामुळे सुवर्ण बाजारात पाहिजे त्या पद्धतीने उलाढाल झाली नव्हती. मात्र यंदा सुवर्णनगरीमध्ये मोठ चैतन्याच वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या तीन वर्षांचा विचार केला तर सोने खरेदीमध्ये २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये सुवर्णनगरीत तब्बल २०० कोटींपेक्षा जास्त उलाढाल झाल्याचं स्वरुप लुंकड यांनी सांगितले.
गेल्या वर्षापेक्षा यंदा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे, मात्र वाढ झाली असताना ही खरेदीत वाढ झाल्याची प्रामुख्याने दोन ते तीन कारणे असल्याचे सुवर्ण व्यावसायिक यांचे म्हणणे आहे. यंदा पाऊस कमी पडला त्याचा थोडा परिणाम हा जाणवत असला तरी मात्र दिवाळी ही महिन्याच्या सुरुवातीलाच आल्यामुळे नोकरदार वर्गाचा पगार , बोनस तसेच सातवा वेतन आयोग त्यांचे पैसे हातात पडले आहेत. त्यामुळेच हातात पैसे असल्यामुळे सहाजिकच सोने गुंतवणूक कडे नागरिकांचा कल असतो आणि त्याच दृष्टीने यंदाच्या दिवाळीत सोन्याच्या खरेदीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
यंदा ग्राहकी वाढल्यामुळे सुवर्ण व्यावसायिकांमध्येही आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे यंदा दिवाळीत सोने खरेदीसाठी ग्राहकांचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसात सुवर्णनगरीत २०० कोटींपेक्षा जास्त उलाढाल झाल्याचे सुवर्ण व्यावसायिक आणि जिल्हा सराफ व्यावसायिक असोसिएशनचे स्वरुप लुंकड यांनी सांगितलं.
दरम्यान, गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत दिवाळीच्या दिवसात सोने चांदी खरेदी व्यवसाय २५ ते ३० टक्के वाढल्यानं सराफा व्यावसायिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News