मुंबई : महाराष्ट्रासह देशभर दिवाळीचा उत्साह आहे. दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी अनेक जण महानगरांमधून आपापल्या गावी परतले आहेत तर काही जण गावाकडे जाण्यासाठी निघण्याचं नियोजन करत आहेत.या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनं उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी मोठी घोषणा केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते धुळे दैनिक एक्सप्रेस सुरु होत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ही एक्स्प्रेस १३ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. प्रवाशांना या एक्स्प्रेसद्वारे प्रवासाचं नियोजन करता येणार आहे. दिवाळीनंतर उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना मुंबईत माघारी येताना या गाडीचा फायदा होणार आहे.
मध्य रेल्वेनं हा निर्णय घेत उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना दिवाळी गिफ्ट दिलं आहे. धुळे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- धुळे ही दैनिक एक्स्प्रेस १३ नोव्हेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल. गाडी क्र. ११०११ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- धुळे एक्स्प्रेस ही सीएसएमटीहून दि. १३ नोव्हेंबरपासून दररोज १२.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी धुळे येथे २०.५५ वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ११०१२ धुळे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस ही धुळ्याहून दि. १३.११.२०२३ पासून दररोज ६.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे १४.१५ म्हणजेच दुपारी सव्वा दोन वाजता पोहोचेल.

धुळे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- धुळे ही दैनिक एक्स्प्रेस सुरु झाल्यानं नाशिक, जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील प्रवाशांना याचा लाभ होणार आहे.
मध्य रेल्वेनं या गाडीसाठी दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, निफाड, लासलगाव, मनमाड जंक्शन, नांदगाव, चाळीसगाव, जामधा, शिरूड हे थांबे निश्चित केले आहेत.
धुळे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेसला एकूण १६ एलएचबी कोच असतील.
१ एसी चेअर कार
१३ नॉन एसी चेअर कार (५ आरक्षित आणि ८ अनारक्षित)
१ जनरल सेकंड क्लास कम ब्रेक व्हॅन
१ जनरेटर कार.
दरम्यान, या दैनिक एक्स्प्रेससाठी तिकीट आरक्षण सुरू आहे, अशी माहिती देखील रेल्वेनं दिली आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News