• Mon. Nov 25th, 2024

    निराधार वयस्कर दांम्पत्याची दिवाळी फराळा विनाच; धाराशिवमधील वृद्ध जोडपं मुलांच्या आधाराच्या प्रतिक्षेत

    निराधार वयस्कर दांम्पत्याची दिवाळी फराळा विनाच; धाराशिवमधील वृद्ध जोडपं मुलांच्या आधाराच्या प्रतिक्षेत

    धाराशिव: सध्या दिपावलीची सर्वत्र धामधुम सुरु आहे. अगदी लहान मुलांपासून वयस्करांपर्यंत दिपावली उत्सव साजरा करण्यासाठी गोडधोड पदार्थ, सामान, कपडे खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. घरांघरात दिपावली फराळ बनवण्यासाठी महिलांची लगबग सुरु आहे. पण असं एक कुटुंब आहे ज्यांना अपत्य असताना देखील निराधाराचे जीवन जगावे लागत आहे. त्यांना उटणे ना, कपडा ना, गोडधोड फराळ घरात अंधार जीवनात अंधार अशी परिस्थिती या निराधार वयस्कर दांम्पत्याची झाली आहे.
    औद्योगिक वसाहतींमधील केमिकलयुक्त पाण्यामुळे इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात; नदीवर पाण्याचा फेस
    धाराशिव शहरातील माणिक चौक परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून शिलाईचा व्यवसाय करणारे साधू शिंदे, त्यांची पत्नी सुमित्रा शिंदे हे वृद्ध दाम्पत्य राहतात. त्यांना दोन मुले आणि दोन मुली असताना देखील ते त्यांना कोणी सांभाळत नसल्यामुळे ते निराधारचे जीवन जगत असून ते खऱ्या अर्थाने निराधार झालेल आहेत. ते मुळचे बीड जिल्ह्यातील असून १९७२ सालातील दुष्काळामध्ये धाराशिव शहरात येऊन मोलमजुरी करत होते. तेव्हापासून ते आजतागायत धाराशिव येथेच राहतात. जगण्यासाठी कुठलाच आधार नसल्याने त्यांच्याकडे एक शिलाई मशीन असून त्यावर ते जुने कपडे शिवून देण्याचे काम करतात. मात्र कोरोनानंतर जुने कपडे शिवण्यासाठी देखील त्यांच्याकडे कोणी फिरकत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.

    मुंब्य्रात ठाकरे-शिंदे वाद चिघळला, उद्धव ठाकरे भेट देणार; शाखेबाहेर मोठा बंदोबस्त

    या वृद्ध दांपत्याचा आता कोणीही सांभाळ करत नाही. एका पत्र्याच्या खोलीमध्ये ते राहतात. यामध्ये त्यांना संसार उपयोगी लागणाऱ्या मोजक्याच वस्तू आहेत. तसेच शहरातील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांकडून त्यांना जेवण दिले जाते. २ मुलींची लग्न झाली असल्याने त्या सासरी असतात. विशेष म्हणजे दिवाळीतही त्यांच्याकडे कोणी येत नाही स्वतःची मुले असून सुद्धा त्यांना प्रत्येक वर्षी दिवाळी ही अंधारातच साजरी करावी लागते. अशा वृद्ध दांपत्यास सुज्ञ नागरिकांनी मदतीचा हात दिला तर त्यांची दिवाळी नक्कीच गोड होण्यास मदत झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र गरज आहे ती माणुसकी आणि आपुलकीपणातून मदतीची.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *