• Sat. Sep 21st, 2024
मी कृष्णभक्त! जमीर शेख झाले शिवराम आर्य, धीरेंद्र शास्त्रींच्या उपस्थितीत हिंदू धर्माचा स्वीकार

छत्रपती संभाजीनगर : नगरमधील ‘जमीर शेख’ यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील दहा जणांनी हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री बाबांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हे धर्मांतर केले आहे. आता त्यांचे नाव ‘शिवराम आर्य’ झाले असून त्यांच्या पत्नीचे नाव सीता आर्य तर मुलगा बलराम आणि कृष्णा असे करण्यात आल्याचे सांगण्यात आले. नगरमधील बंजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम झाला.

जमीर शेख नगरच्या कल्याण रोड भागात राहतात. मोलमजुरी करून त्यांच्या कुटुंबियांची उपजीविका चालते. शेख यांच्या कुटुंबात लहानपणापासूनच हिंदू देव-देवतांची पूजा आराधना केली जाते. हिंदू धर्मावर त्यांची श्रद्धा आहे. त्याही पुढे जाऊन त्यांनी आपल्या दोन्ही मुलींचे विवाह हिंदू पद्धतीने करून दिले आहेत. आम्ही कुटुंबीय इच्छेने हिंदू धर्मात दाखल झालो असून यासाठी कोणाचाही दबाव नाही, असे त्यांनी सांगितले.

यासाठी पुढाकार घेणारे नगरचे बजरंग दलाचे अध्यक्ष कुणाल भंडारी यांनी सांगितले की, ‘सहा ते सात महिने शेख यांच्यासोबत राहून त्यांच्याबद्दलची सर्व माहिती जाणून घेतली. त्यांची प्रबळ इच्छा लक्षात घेऊन त्यांना हिंदू धर्मात प्रवेश देण्यासाठी धीरेंद्र शास्त्री यांच्याकडे घेऊन आलो.’

नगरमध्ये संमिश्र प्रतिसाद

शेख यांच्या निर्णयाचे हिंदुत्ववादी संघटनांकडून स्वागत करण्यात आले. तर मुस्लिम धर्मींयांनी जमीर शेख पूर्वीपासूनच आमच्या धर्मात फारसे मिसळत नव्हते. तसेच त्यांचा कल आणि वागणेही हिंदू धर्माप्रमाणेच होते. ते हिंदूत्वादी संघटनांचे पदाधिकारी असल्याचेही म्हटले आहे.

लहानपणापासून आपण हिंदू रिवाजानुसार पूजापाठ करीत असून सनातन धर्मावरील श्रद्धेमुळे हे धर्मांतर करीत असल्याच्या भावना शेख यांनी व्यक्त केल्या आहेत. जमीर शेख यांनी आपल्या दोन्ही मुलींची लग्न हिंदू धर्मात करून दिल्याचेही त्यांनी सांगितले. व्यवसायाने मजूर असलेले शेख लहानपणापासून हिंदू रिवाजांनुसार पूजापाठ करत आहेत. त्यांना हिंदू धर्मात यायचे होते. त्यासाठी काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांना या कार्यक्रमात या धर्मांतराची संधी मिळवून दिली.

सत्यजीत तांबेंच्या संघटनेसाठी काम, काँग्रेस विद्यार्थी आघाडीच्या पदाधिकाऱ्याला ‘कारणे दाखवा’

या धर्मांतरासाठी आपल्यावर कोणताही दबाव नसल्याचे ते म्हणाले. शेख ९ लेकरांचे वडील आहेत. काही नातवंडं देखील आहेत. आपल्या निर्णयामुळे नातेवाईक वगैरे दुरावतील का, असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की आपल्या बहिणीने सुद्धा हिंदू धर्म स्वीकारला आहे. आपली पत्नी हिंदू असून ती वंजारी समाजाची आहे, असं त्यांनी सांगितलं. शेख हे असीम कृष्ण भक्त आहेत, आपल्या पत्नीसह ते हिंदूं धर्माचे सर्व सण साजरे करतात. यंदाच्या वर्षी ते दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी करणार आहेत.

पवारांची साथ सोडणार, राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या हाती ‘कमळ’, फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपप्रवेश
बागेश्वर धाम यांचे व्हिडिओ आपण मोबाईलवर पहिले आणि आपल्यातील सनातन धर्म जागा झाला. त्यानंतर बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने आपण आज इथे पोहोचलो असून पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला असल्याचे जमीर शेख यांनी सांगितले. श्री बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्याशी बजरंग दलाचे अध्यक्ष कुणाल भंडारी यांनी भेट घडून आणली, तेव्हाच शेख यांनी सनातनी धर्म स्वीकारला.

दोन मुलं अन् सात मुली; मुस्लिम कुटुंबातील १० जणांनी स्वीकारला हिंदू धर्म, बागेश्वर बाबांच्या हस्ते दीक्षा!

Read Latest Updates And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed